
निळू दामले
संयुक्त राष्ट्रांची ‘कॉप २९’ हवामान विषयक परिषद नुकतीच बाकू येथे पार पडली. भारतासह १९८ देशांनी यात सहभाग घेतला. हवामानविषयक समस्यांना किंवा हवामानबदलामुळे होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी गरजू, कमकुवत देशांना पुरेशा प्रमाणात निधी देण्याबाबतचा निर्णय यात घेतला जाणे अपेक्षित होते. हवामान अर्थपुरवठा कृती निधी आणि नुकसान निधी हे दोन महत्त्वाचे मुद्दे या परिषदेत होते. परंतु, याबाबत म्हणावी तेवढी पावले टाकली गेली नाहीत.