

US Iran Agreement
esakal
प्रियदर्शन - saptrang@esakal.com
अमेरिकेने युद्धात इराणचे प्रचंड नुकसान केले. त्याच्या सर्वोच्च राजकीय आणि लष्करी ताकदीचा मोठ्या प्रमाणावर शेवट केला, सैन्याचीही मोठी हानी केली आणि तेहरानचेही मोठे नुकसान केले. इतके सगळे करूनही अमेरिका इराणला निर्णायकपणे पराभूत करू शकली नाही. उलट नुकत्याच झालेल्या करारामुळे पश्चिम आशियातील इराणच्या स्थानावर नव्याने शिक्कामोर्तब झाले आहे.
अमेरिका-इराण यांच्यात झालेल्या करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सध्याच्या जागतिक व्यवस्थेत मोठ्या बदलांचे संकेत दिसत आहेत का? या करारानंतर ना अमेरिका पूर्वीसारखी अमेरिका राहिली आहे, ना इराण पूर्वीसारखा इराण. चीन आणि रशियासह अनेक देशांची राजकीय प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय स्थानं बदलताना दिसत आहे.
खरे तर, इस्राईलच्या इशाऱ्यावर इराणला धडा शिकवण्याच्या हट्टात अमेरिकेने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. हा करार नसून अमेरिकेचा पराभव आहे म्हणजे तो १९६० च्या दशकात व्हिएतनामकडून झालेल्या पराभवापेक्षाही अधिक मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. कारण इराण युद्धाचे परिणाम आता जागतिक व्यवस्थेच्या स्वरूपात बदल घडवताना दिसत आहेत.