डॉ. मनीष दाभाडे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प यांच्या या बदलत्या धोरणामुळे, अमेरिकेविषयीची अविश्वास अधोरेखित झाले आहे. अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील सख्य भारतासाठी धोकादायक असून, भारतानेही अन्य मोठ्या देशांबरोबरील भागीदारी पुन्हा दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काही आठवड्यांमध्ये अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये लक्षणीय स्थित्यंतरे झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे विलक्षण पद्धतीने स्वागत केले. ‘व्हाइट हाऊस’मध्ये त्यांच्यासाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले होते.