
अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्याच्या स्वप्नांना आता सुरुंग लागणार की काय, असं अनेक भारतीय विद्यार्थ्यांना वाटतं आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिवसेंदिवस नवे नियम लागू करत चाललेत. नुकतेच अमेरिकेतल्या व्हिसावर स्थगिती आणण्यात आलीय. अगदी हार्वर्डसकट अनेक विद्यापीठांमध्येही बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थी मात्र आता दुसऱ्या देशांकडे अधिक आशेने पाहतायत.