Premium|Study Room : अमेरिकेतील हिमवादळे: भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय आव्हाने

US Winter SnowstormUS Winter Snowstorm : अमेरिकेतील भौगोलिक रचना आणि हवामानातील बदलांमुळे हिमवादळे अधिक तीव्र होत आहेत. प्रचंड हिमवृष्टी, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतूक विस्कळीत होणे यामुळे सामाजिक-आर्थिक परिणाम वाढले आहेत. हवामान बदल आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यांची गरज अधोरेखित होते.
US Winter SnowstormUS Winter Snowstorm

US Winter SnowstormUS Winter Snowstorm

esakal

Updated on

लेखक - सुदर्शन कुडचे

अमेरिकेच्या भौगोलिक रचनेमुळे आणि हवामानातील वैविध्यामुळे तेथे हिवाळ्यात हिमवादळे वारंवार अनुभवास येतात. उत्तर ध्रुवाकडील अतिथंड हवा, महासागरांवरील आर्द्रता आणि वातावरणातील प्रवाह यांचा संगम झाल्यावर प्रचंड हिमवृष्टी, जोरदार वारे आणि अत्यल्प तापमान अशी स्थिती निर्माण होते. अशा हिमवादळांचा परिणाम केवळ थंड प्रदेशांपुरता मर्यादित न राहता मध्य आणि दक्षिण भागांपर्यंत पोहोचतो. अलीकडील वर्षांत ही हिमवादळे अधिक तीव्र आणि अनिश्चित स्वरूपाची होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. त्यामुळे भूगोल, हवामानशास्त्र आणि मानवी जीवन यांचा परस्पर संबंध समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

हिमवादळांसाठी कारणीभूत असणारी  अमेरिकेची भौगोलिक रचना

अमेरिका हा विस्तीर्ण खंडीय देश असून तेथे पर्वतरांगा, विस्तीर्ण मैदाने, महासागरी किनारे आणि अंतर्गत सरोवरे आढळतात. कॅनडालगतचा उत्तर भाग थंड हवेच्या थेट प्रभावाखाली येतो. मोठ्या सरोवरांच्या परिसरात थंड हवा उबदार पाण्यावरून जाताना आर्द्रता शोषून घेते, त्यामुळे अचानक आणि जड हिमवृष्टी होते. पूर्व किनाऱ्यावर महासागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हिमवादळे तीव्र होतात, त मध्य भागात सपाट भूभागामुळे थंड हवेचे प्रवाह वेगाने पसरतात.

US Winter SnowstormUS Winter Snowstorm
Premium|Study Room : केवळ वांशिक हल्ले नव्हे, हे तर भारताच्या आत्म्यावर उमटलेले विदारक ओरखडे!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com