Premium|Study Room : एल निनो म्हणजे काय? जाणून घ्या समुद्राचे पाणी गरम होण्याचा मान्सूनवर होणारा परिणाम

El Niño Weather Patterns : एल निनोमुळे प्रशांत महासागरातील पाणी गरम झाल्याने जागतिक हवामान चक्रावर गंभीर परिणाम होतात. यामुळे ऑस्ट्रेलियात दुष्काळ, तर पेरूमध्ये अतिवृष्टी होते. भारतातील मान्सूनवरही याचा मोठा प्रभाव पडत असून, तापमानात सातत्याने वाढ दिसून येते.
El Niño Weather Patterns

El Niño Weather Patterns

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

एल निनो (El Niño) म्हणजे इक्वाडोर आणि पेरूच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या वरच्या पाण्याचे असामान्यपणे गरम होणे होय. जेव्हा पाणी असे गरम होते, तेव्हा समुद्राच्या तळातून वर येणारे थंड आणि पोषक तत्त्वांनी भरलेले पाणी (upwelling) कमी होते. एल निनो साधारणपणे ख्रिसमसच्या सुमारास सुरू होतो आणि काही आठवडे ते काही महिने टिकतो.

कधी कधी एल निनो खूप तीव्र होतो आणि जास्त काळ टिकतो. उदाहरणार्थ, १९९० च्या दशकात १९९१ मध्ये सुरू झालेला एल निनो १९९५ पर्यंत चालू राहिला होता. तसेच १९९७ च्या शेवटापासून १९९८ च्या वसंत ऋतूपर्यंत आणखी एक तीव्र एल निनो दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com