
Dating Trends 2025 In Marathi
‘मला एका मुलीला डेट करायचंय, जिम, स्विमिंग असे छंदही जोपासतोय, कधी कधी ट्रेकलाही जातोय, पण मला आवडेल अशी एकही मुलगी भेटलेली नाही, मी काय करू?’ पुण्यातल्या Subreddit वर ३० वर्षांच्या तरुणाची ही पोस्ट.... तुम्ही Reddit किंवा बाकीचे कोणतेही सोशल मीडिया प्लाटफॉर्म Scroll करून पहा... दिवसाआड एकदा कोणत्या तरी ग्रुप किंवा पेजवर ‘XYZ शहरात Dating चा Scene काय?” अशा पोस्ट पडतातच. 2024 चे वर्ष सरलं आता 2025 मध्ये Dating बद्दल तरुणाचे मत काय? Animal चित्रपटातला रणबीर कपूरसारखा तरुण एखाद्या मुलीला खरंच आवडेल का? टिंडर, बम्बल, ओकेक्युपिड आदी डेटिंग Apps काय म्हणतात, त्याकडे जरा नजर टाकूया, फक्त ५ मुद्द्यांतून.