Budget 2026
E sakal
Premium | Budget 2026 : आगामी अर्थसंकल्पात कोणत्या ५ गोष्टींवर लक्ष ठेवाल?
Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२६ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत अनेक बदल झालेत.
अमेरिका-चीनचा संघर्ष, मधल्या काळात भारत-पाक युद्धसदृश्य स्थिती, हल्ले, जागतिक बाजारपेठेत या सगळ्यामुळे झालेले बदल, सोन्याचांदीच्या गगनाला भिडलेल्या किंमती या सगळ्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात नेमकं काय जाहीर होणार, याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. यावेळी सरकार कोणत्या गोष्टींना प्राधान्य देईल?
भाजपला सलग तिसऱ्यांदा मिळालेली ही सत्ता आता स्थिरावते आहे. आपण निवडणुकीत दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करेल का, सामान्य माणसाला, मध्यमवर्गाला दिलासा मिळेल की पुन्हा उद्योगपतींचीच भर होणार असे अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळेच या अर्थसंकल्पातल्या नेमक्या कोणत्या ५ गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, ते आम्ही दिलं आहे, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

