self identity
Esakal
पुणे - हा विषय सुरू करण्याआधी तुम्ही एक साधा प्रश्न स्वत:ला विचारा... ‘जर कुणाला तरी तुमची एका वाक्यात ओळख करून द्यायची असेल तर ती काय असेल?’ जर तुमची ओळख तुम्ही फक्त कामावरून करून दिली तर मात्र यावर विचार करणं गरजेचं असेल..
अनेकदा आपण आपल्याला कामात इतकं गढून घेतो की, माझ्याशिवाय हे काम होणे नाही असं वाटू लागतं. हळूहळू आपलं काम ही आपली सवय होते, आपली ओळख होते तर कधी तो आपला ‘इगो’ होतो. तेच काम करण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी जेव्हा नेमणूक होते त्यावेळी आपण कोण आहोत याचा नव्याने तपास घेण्याची प्रक्रिया सुरू होते. माझ्या कामाने माझ्या आयुष्यात काही प्रमाणात बदल होणे हा भाग वेगळा, पण माझ्या कामाने माझं संपूर्ण आयुष्य ठरवलं जाणं ही गोष्ट अत्यंत गंभीर मानावी अशीच आहे. मानसशास्त्र सांगतं, व्यक्तीची आत्ममूल्याची भावना एखाद्या एकाच क्षेत्रातील यशावर अवलंबून असेल, तर त्या क्षेत्रातील अपयशाचा मानसिक परिणाम देखील तेवढ्याच तीव्र स्वरूपाचा असू शकतो.
केवळ एवढंच नाही तर हीच गोष्ट तुमच्या दैंनंदिन आयुष्यात, आयुष्यातील नातेसंबंधांवर देखील परिणाम करते. त्यामुळेच मी कोण, माझी ओळख काय, माझी ओळख ही समाजावर माझ्यावर लादली आहे की, मी ती स्वत:हून स्विकारली आहे, मी स्वत: ती स्विकारली असेल तर त्यामागे काही विचार केला आहे का? कामाच्या ठिकाणी मीच, माझंच असं आपलं काहीसं होतंय का? आणि त्याचे आपल्यावर मानसिक परिणाम काय होतात आणि हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं? हे सगळं सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून..