
Parag Patil’s Inspiring Journey to Recognition: उद्योजक आर्यन सिंग कुश्वाह याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याने प्रवासासाठी बुक केलेल्या कॅबचा चालक हा भारतासाठी विविध स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा खेळाडू निघाला. पराग पाटील, असे या खेळाडूचे नाव. आर्यनच्या पोस्टमध्ये परागने 'ऑलिम्पिक' खेळल्याचे सांगण्यात आले होते, परंतु पराग पाटील या नावाचा ऑलिम्पियनपटू होऊन गेला असे कुणालाही आठवत नव्हते. मग, पराग कोणत्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता? त्याने आतापर्यंत १७ आंतरराष्ट्रीय पदकं जिंकण्याचा दावा केलाय, ती कोणत्या स्पर्धेत? एवढी पदकं जिंकून त्याच्यावर Cab Driver बनण्याची वेळ का आली? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधताना एक प्रेरणादायी प्रवास उलगडत गेला. चला तो वाचूया..