Why India needs its own Big Four companies: भारत सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाने ६ जून रोजी एक बैठक घेतली. त्यामध्ये भारताला स्वतःच्या 'बिग फोर'अकाउंटन्सी कंपन्यांसारख्या मोठ्या सल्लागार कंपन्या कशा विकसित करता येतील यावर चर्चा करण्यात आली. सध्या, डेलाइट, प्राइस वॉटर हाऊस कूपर्स, अर्न्स्ट अँड यंग आणि केपीएमजी, या कंपन्या जागतिक स्तरावर व्यावसायिक सेवा देण्यात आघाडीवर आहेत. ग्रांट थॉर्नटनआणि बीडीओ या कंपन्यांसोबत त्या भारताच्या ऑडिट क्षेत्रातही आघाडीवर आहेत.
पण या कंपन्यांना डावलून भारत सरकार स्वतःचे 'Big Four' निर्माण करण्याच्या तयारीत आहेत; असा निर्णय भारत सरकार का घेत आहे..? या निर्णयामागची उद्दिष्ट काय आहेत? हे भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे का..? याचे भविष्यात काय परिणाम होतील..? हे सगळं 'सकाळ प्लस' च्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..