
डॉ. श्रीमंत कोकाटे
पन्हाळगड म्हणजे सह्याद्री पर्वतावरील अजिंक्य असा गड. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी इत्यादींच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा तो साक्षीदार आहे.
शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने, पदस्पर्शाने आणि शौर्याने पावन झालेल्या पन्हाळगडाला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. वीर शिवाजी काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा त्याग अन् समर्पणाची गाथा इथेच लिहिली गेली...