

Why Anger Is Becoming More Dangerous in Indian Society
E sakal
Anger Issues in India: Why People Are Turning Violent Against Their Loved Ones
समाजमाध्यमं, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र सगळीकडे गुन्हेविषयक बातम्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. जिकडेतिकडे राग आणि त्यातून केलेल्या कृत्यांचे निरनिराळे परिणाम दिसून येतात. कधी त्यातून कुणाच्या जीवावर बेततं तर कधी गंभीर जखमा होतात.
कधी सहप्रवासी तर कधी पालक आणि मुलं एकमेकांच्या जीवावर उठलेली दिसतात. जवळचे नातेवाईक त्यांच्यातील छोटे वाद एकदमच भडकतात.
बरं या सगळ्या वादांसाठी, भांडणांसाठी मोठी कारणंही नसतात. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही लोक एकमेकांच्या जीवावर उठताना दिसतात. लहान सहान मुलंही सहजी जीव देण्याचा विचार करतात. घरातून पळून जातात...
या सगळ्याचं कारण काय, समाज म्हणून खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्यं हरवलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आम्ही संवाद साधला काही मानसोपचारतज्ज्ञांशी. सोबत भारतातील मानसिक आरोग्याविषयक काही अहवालही सापडले. या अहवालातून लोकांच्या या रागामागचं कारण स्पष्ट होतं.
सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.