Carpets variety : कार्पेटने वाढवा घराची शान

सध्या कार्पेटमध्येही भरपूर व्हरायटी बघायला मिळते,
Carpets
Carpets sakal

कार्पेटने वाढवा घराची शान नवीन घराला ट्र ेंडी लूक द्यायचा असो, किंवा जुन्या घराचा जुनाटपणा खोडून काढायचा असो, अशा वेळेस कार्पेटचा विचार प्रामुख्याने करणे फायद्याचे ठरते. कार्पेटच्या मनमोहक दनिु येची ही सफर.

घरात पाऊल टाकताच प्रसन्न वाटावे यासाठी कार्पेटचा पर्याय योग्य ठरतो. घर नवीन असो वा जुने, कार्पेट वापरले की घराचा लूक पूर्णपणे बदलतो. सध्या कार्पेटमध्येही भरपूर व्हरायटी बघायला मिळते, पण आपल्या घरासाठी योग्य कार्पेटची निवड करताना कोणती मोजपट्टी लावायची, याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी कार्पेटचे प्रकार, रंग, स्टाईल, दर्जा या सगळ्याची गोळाबेरीज करायला हवी.

कार्पेटचे प्रकार

कार्पेटचा रंग कोणता असावा, हे ठरविणे सोपे असले तरी; कार्पेटच्या प्रकारावर एकमत होणे तुलनेने कठीण ठरू शकते. सीग्रास, ज्यूट, सीसाल, कॉयर, वुलन, आर्टिफिशियल असे कार्पेटमध्ये आढळणारे काही प्रकार आहेत. संपूर्णतः नैसर्गिक रंगांचा वापर केला गेल्याने हे सर्वच प्रकार उत्तम ठरतात. या

प्रकारांची ही थोडक्यात माहिती ः

सीग्रास : हे कार्पेट मुख्यतः पायऱ्यांवर बसविले जाते.हे कार्पेट बनविताना कोणतीही कृत्रिम प्रक्रिया केली जात नाही. हे कार्पेट सहज स्वच्छ होते. ओलसर किंवा दमट ठिकाणी हे कार्पेट वापरणे टाळावे.

ज्यूट : भारतात या प्रकारच्या कार्पेटचा वापर सर्वाधिक होतो. या कार्पेटची निर्मिती तागापासून केली जाते. टिकाऊपणा हे या कार्पेटचे वैशिष्ट्य सांगता येईल. घराला नैसर्गिक लूक देण्याच्या विचारात असाल, तर या कार्पेटचा पर्याय अवश्य निवडा.

खोलीनुरूप कार्पेटची निवड प्रत्येक खोलीचे महत्त्व आणि स्वरूप लक्षात घेऊन कार्पेटची निवड सयुक्तिक ठरते. लिव्हिंग रूमसाठी असे कार्पेट निवडा, ज्याचा रंग उपयुक्त आणि स्टायलिश असेल. तर बेडरूममध्ये बेडच्या समोर वुलनचे कार्पेट निवडले, तर खोलीतील उबदारपणात वाढ होते.

मुलांच्या खोलीसाठी कार्पेट निवडताना शक्यतो गडद रंगांची निवड करा. शिवाय ही कार्पेट धुण्यास सहज असावीत. काही कार्पेट आवाजरोधकही असतात, तुमच्या गरजेनुसार या कार्पेटची निवड करू शकता.

कार्पेटने वाढवा घराची शान नवीन घराला ट्र ेंडी लूक द्यायचा असो, किंवा जुन्या घराचा जुनाटपणा खोडून काढायचा असो, अशा वेळेस कार्पेटचा विचार प्रामुख्याने करणे फायद्याचे ठरते. कार्पेटच्या मनमोहक दनिु येची ही सफर.

स्मार्ट होम्स :

बदलत्या काळाचा ट्रेंड जेव्हा आपण नव्या घराचं इंटिरिअर डिझाईन ठरवतो किंवा राहते घर अपग्रेड करु पाहतो, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो. उदाहरणार्थ, घराला रंग कोणता द्यायचा, फर्निचर कसे असेल, रुम्स कशा सजवायच्या वगैरे वगैरे.

या आधुनिक काळात घराचे सौंदर्य खुलवत ते अधिक अप-टू-डेट करण्यासाठी आवश्यक असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर. स्मार्ट होम म्हणजे काय? स्मार्ट होम म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे घर! या घरात आपल्या वेगवेगळ्या गरजांसाठी स्मार्ट रीतीने तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. यामध्ये लायटिंग, थर्मोस्टॅट्स, एसी, टीव्ही, सीसीटीव्ही व इतर सुरक्षा व्यवस्था

किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं एकाच ठिकाणाहून कंट्रोल करता येतात. बदलत्या काळाची गरज जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्मार्ट होम्सचे प्रमाण कमी आहे. मात्र, आता गेल्या काही वर्षात ही संकल्पना देशात हळूहळू रुजत चालली आहे. कोरोना संकटानंतर अनेकांनी या स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर अनावश्यक आणि खर्चिक आहे,

असा पूर्वी असलेला समज आता दूर होऊ लागला आहे. याऊलट, स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराने घरातली बरीचशी कामे आपल्या नजरेआड तरीही सुरळितपणे पार पडतात. स्मार्ट होम्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपकरणांच्या सुनियोजित वापरामुळे वीजेची बचत होऊन खर्चही कमी होतो. स्मार्ट होमसाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आता परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. यामुळेच, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

जरी तुम्हाला एकाचवेळी संपूर्ण घर ऑटोमेट करणे शक्य नसले, तरी तुम्ही टप्प्याटप्प्याने हे साध्य करू शकता. सध्या बाजारात स्मार्ट तंत्रज्ञानाची थक्क करणारी रेंज उपलब्ध आहे. तुमची गरज आणि बजेटनुसार तुम्ही त्याची निवड करू शकता. संपूर्ण घराचा रिमोट कं ट्रोल घरातील वेगवेगळ्या प्रकारची अद्ययावत उपकरणे सुलभ रीतीने नियंत्रित करण्यासाठी एक मध्यवर्ती यंत्रणा आवश्यक आहे. ती तुम्हाला स्मार्ट हबच्या रुपाने मिळते. मोबाईल अ‍ॅप किंवा व्हॉईस कमांड्सद्वारे या हबमार्फत तुमच्या घरातील सर्व उपकरणांना सूचना देता येतात.

अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आजकाल स्वतंत्र स्मार्टफोन अप‍ॅ्सही उपलब्ध असतात. मात्र, वेगवेगळ्या स्वरुपाची उपकरणे एकाचवेळी हाताळण्यासाठी स्मार्ट हब अधिक सोयीस्कर ठरते. घरात कोणकोणती उपकरणे वापरणार आहात, त्या अप‍ॅ्सना अनुसरुन स्मार्ट हबची निवड होणे गरजेचे आहे. वीजबचतीलाही फायदेशीर स्मार्ट होम तंत्रज्ञानात स्मार्ट प्लग

हा प्रकार अतिशय अफोर्डेबल आहे. हे प्लग तुमच्या घरातील उपकरणांचे स्मार्टनियमन करण्यास मदत करते. हे प्लग स्मार्टफोनवरुनही कंट्रोल करता येतात. यामुळे, जेव्हा आपण प्रत्यक्ष घरात नसू तेव्हाही आपण उपकरणे गरजेनुसार चालू-बंद करू शकतो. यामुळे, वीजेचाही वापर सुयोग्य रीतीने होऊन बचत होण्यास मदत होते.

आजकाल स्मार्ट स्विचेसच्या साहाय्याने घरातील दिव्यांचा प्रकाश, फॅनचा स्पीड इत्यादी गोष्टी कमी-जास्त करता येतात. त्याचप्रमाणे, पडदेही स्वयंचलित करण्याची सोय उपलब्ध आहे. आपण ॲप किंवा व्हॉईस कमांडद्वारे ते बदलत्या काळानुसार घरांचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने माणसाचे शारीरिक कष्ट कमी होण्यास मदत तर झालीच, पणआता हे तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, तुमच्या एका हाके वर तुमच्या घरातली सगळी कामे आपोआप पार

पडतात. बंद करू शकतो किंवा उघडू शकतो. संपूर्ण घरासह विविध उपकरणांचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅट्सचा वापर होतो. अद्याप भारतीय घरांमध्ये थर्मोस्टॅटचा वापर तुलनेने कमी प्रमाणात आढळतो. उत्कृष्ट वातावरणनिर्मितीसाठी घरात एखादं मंगल कार्य असेल तर तुम्ही त्यानुसार वार्म/फ्रेश फील देणाऱ्या रंगांचे लाईट्स छान वाटतात. याऊलट, जर घरात पार्टी असेल तर ब्राईट दिवे छान वाटतील.

स्मार्ट लायटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही घरात वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स सेट करु शकता. हल्ली विविध प्रकारचे स्मार्ट बल्ब उपलब्ध आहेत. रिमोट कंट्रोल किंवा व्हॉईस कंट्रोलद्वारे ते नियंत्रित करता येतात.सुरक्षिततेची हमी घराच्या सुरक्षिततेची खात्री करुन घेण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे स्मार्ट लॉक्स! या लॉक्सच्या मदतीने

घराच्या कोणत्याही कोपऱ्यातून दार उघडता येऊ शकते. पासवर्ड असल्याने अनोळखी व्यक्ती घरात येऊ शकणार नाही. जर घराबाहेर काही संशयास्पद हालचाल आढळून आली तर या डिव्हायसेसवरुन अलर्टही मिळतो. काही स्मार्ट लॉक्समध्ये आलेल्या पाहुण्यांना तात्पुरता ॲक्सेस कोड देण्याची सोय असते. जेणेकरुन, त्यांना तो कोड देऊन थेट घरात येता

येईल. सीसीटीव्ही कॅमेरेही आता आणखी प्रगत होऊ लागले आहेत. यामध्ये ॲडव्हान्स सुरक्षेसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग, मोशन डिटेक्शन आणि नाईट व्हिजन यासारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध अाहेत. मात्र, तुम्हाला जर संपूर्ण घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे शक्य नसेल तर तुम्ही डोअरबेल कॅमेरा बसवण्याचा विचार करु शकता.

स्मार्ट मनोरंजन आता अनेक घरांमध्ये स्मार्ट टीव्हीचे आगमन झाले आहे. स्मार्ट टीव्हीबरोबरच आजकाल स्मार्ट स्पीकर्सही प्रचलित आहेत. यावरून साध्या व्हॉईस कमांडच्या साहाय्याने आपल्या आवडीचे संगीत ऐकता येते.

सीसाल :

परदेशात या प्रकाराला अधिक मागणी आहे. मेक्सिको, ब्राझील, पूर्व अफ्रिका या देशांमध्ये या कार्पेटची निर्मिती होत असल्याने भारतात या कार्पेटची किंमत अधिक आहे. म्हणून या कार्पेटचा वापर मुख्यतः ऑफिसेसमध्ये केलेला आढळतो.

l कॉयर :

हा कार्पेटचा नैसर्गिक प्रकार आहे, नारळाच्या शेंड्यांपासून या कार्पेटची निर्मिती होते. अर्थातच केरळमध्ये या कार्पेटची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. फक्त या कार्पेटचा एक तोटा म्हणजे ही कार्पेट जास्त प्रमाणात धूळ खेचून घेतात. त्यामुळे धूळ नसणाऱ्या ठिकाणी यांचा वापर करणे उपयुक्त ठरते. हे कार्पेट अतिशय मऊ असल्याने किड्स रूममध्ये या कार्पेटचा वापर बिनधास्तपणे करू शकता.

वुलन : हा कार्पेटचा अतिशय उबदार प्रकार आहे. असे असले तरी त्याचा वापर सर्रास करता येत नाही. थोडे ओले झाले, तर लगेच कुबट वास येतो. हे कार्पेट लोकरीपासून बनविले जात असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. निवडीचे निकष कार्पेटचे प्रकारांप्रमाणेच त्यांच्या डिझाईनमध्येही वैविध्य बघायला मिळते.

तुमची कार्पेटची निवड अचूक ठरावी यासाठी हे कानमंत्र...सगळ्यात आधी कार्पेटच्या माध्यमातून तुम्हाला घराला कोणता लूक द्यायचा आहे, हे निश्चित करा. हे एकदा निश्चित झाले, की कार्पेटची निवड सोपी होते.कार्पेटची निवड करताना नेव्ही ब्लू, डीप मरून, ब्राईट बेरी, मातकट असे रंग खोलीचे रूप उजळवितात आणि

एकत्रितपणाची भावना वाढीस लावतात. तुमच्या घरात खूप अंधार असेल तर फिकट रंगाच्या

कार्पेटची निवड योग्य ठरते. जर घरातील सोफा, पडदे, भिंत यावर खूप नक्षीकाम असेल, तर कार्पेट शक्यतो प्लेन निवडा किंवा याउलटही करू शकता. म्हणजे इतर सर्व गोष्टी साध्या ठेवून उठावदार नक्षीचे कार्पेट निवडू शकता. प्रिंटेड कार्पेटची निवड करून घराला मॉडर्न लूक देता येऊ शकतो. व्हिंटेज प्रकारातील डिझाईन्स, फुला-पानांचे नाजूक नक्षीकाम किंवा प्राण्यांच्या प्रिंटची कार्पेटही खोलीच्या सजावटीला एका वेगळ्या उंचीवर नेतात. बिबट्या, वाघ, झेब्रा, चित्ता प्रिंटला अतिशय मागणी आहे.

कार्पेटचा रंग भिंती आणि फर्निचरशी जुळायला हवा.वॉल टू वॉल कार्पेटपेक्षा आता बेडजवळ किंवा टी-पॉयखाली लहान रग टाकण्याचा ट्रेंड आहे. आयाताकृती आकारासह कार्पेट इतर वेगवेगळ्या आकारांमध्येही उपलब्ध असतात. त्यांचाही खुबीने वापर करता येऊ शकतो. कार्पेटची स्वच्छता कार्पेट शक्यतो प्रोफेशनल क्लीनर्सकडून स्वच्छता करावे. पण दरवेळी तसे करणे शक्य नसल्यास काही साध्या सोप्या उपायांनी आपण कार्पेटची स्वच्छता अगदी सहज करू शकतो.

कार्पेटवर डाग पडला, तर स्वच्छ कागदाने तो डाग पुसा. बहुतांश कार्पेट नैसर्गिक असल्याने त्यांची स्वच्छता व्हाईट व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट बनवून करू शकता. काही डाग एकदा धुतल्याने जात नाहीत, अशा वेळेस सलग काही दिवस सलग धुणे आवश्यक आहे. थोडक्यात, कार्पेट निवडीपासून त्याच्या स्वच्छतेपर्यंत सर्व बाबतीत सजगता बाळगली, तर घराचे रूप सहज खुलेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com