Kitchen च्या इंटिरिअर प्रमाणे करा प्रकाशयोजना

किचन तीन प्रकारचे असतात एक गॅलरी, एक स्टैंडर्ड व आता जो मूळ घरात आहे तो आहे आइसलँड. किचन हे घराचे वर्कशॉप म्हणून काम करते. इथे प्रकाशयोजनाही फंक्शनल पर्पझसाठी असावी आणि फोकस्ड असावी
किचनमधील प्रकाशयोजना
किचनमधील प्रकाशयोजनाEsakal

बहुतेक नव्या घरांमध्ये स्वयंपाकघराची जागा ही दिवाणखान्यात असते किंवा त्याला लागून असते. पेंट हाउसमध्ये स्वयंपाकाच्या जागेला लागून दिवाणखान्याचे दोन भाग होतात. एक इनफॉर्मल सिटिंग एरिया जो या डायनिंग हॉलजवळ असतो व दुसरा भाग हा फॉर्मल सिटिंग एरिया हा आहे. जो थोडा दूर व कमी जागेत बसवला आहे. तर आज आपण पेंट हाउसमधील किचनची प्रकाशयोजना पाहणार आहोत. डायनिंगला लागून एका वेगळ्या जागेत किचनची रचना केलेली आहे. Marathi Decoration Tips Light Arrangement in Penthouse Kitchen

इथे किचन Kitchen हे स्वच्छ पांढऱ्या, आयताकृती आकारामध्ये डिझाइन केले आहे व सर्व गोष्टी भिंतीवरील कपाटांमध्ये व ओट्याखालील ट्रॉलीजमध्ये बंदिस्त आहेत. ज्याची ज्या वेळेस उपयोगिता असेल त्या वेळेस उघडण्यात येतात याचे कारण स्वयंपाक Cooding करताना जागा मोकळी मिळते व पसारा दिसत नाही.

अशा वेळेस या ठिकाणी प्रकाशयोजनेचे महत्त्वाचे काम म्हणजे संपूर्ण खोली संतुलित प्रकाशात डेलाइटमध्ये प्रकाशित करणे ज्या कारणाने कुठलीही क्रिया सुरळीत व वेगाने होते. आता किचनमध्ये लख्ख प्रकाश निर्माण झाल्यास एकाच जागेत दोन प्रकाशित थर तयार होतात व त्यामुळे डोळ्यांना अॅडजेस्ट करणे अवघड जाते व याच कारण डोळे व हात यांचे सहकार्य मध्ये वेळ लागून काम थोडे मंदावते, तर दुसरीकडे नुसताच ट्यूबलाइटचा प्रकाश हा नंतर एकसूरीपणा देतो.

हे देखिल वाचा-

किचनमधील प्रकाशयोजना
Kitchen Tips: किचन मधील 'ही' पाच स्मार्ट उपकरणे जी कमी जागेत बसतात आणि तुमचे काम सोपे करतात.

किचन तीन प्रकारचे असतात एक गॅलरी, एक स्टैंडर्ड व आता जो मूळ घरात आहे तो आहे आइसलँड. किचन हे घराचे वर्कशॉप म्हणून काम करते. इथे प्रकाशयोजनाही फंक्शनल पर्पझसाठी असावी आणि फोकस्ड असावी. इथे वेगवेगळ्या क्रिया जसे जेवण बनवणे, वाढणे, भाज्या धुणे आणि इतर कामे होत असतात.

आता किचनचे इंटेरिअरसुद्धा थिमप्रमाणे बदलत असते. कधी मॉर्डनस्टीक थीम तर कधी वूड फर्निश्ड कंट्रीसाईड किचन, तर कधी कलरियल स्टाईलचे मोठं किचन या प्रत्येकाचे एक व्यक्तिमत्त्व आहे आणि त्याला त्या प्रमाणात प्रकाशित करणे जास्त उचित ठरते.

आता या वेगवेगळ्या तऱ्हेच्या किचनमध्ये साधारण एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे वर्किंग प्लॅटफॉर्म हा भिंतीला लागून असतो. काम करताना एक मूलभूत गरज म्हणजे प्रकाश. हा आपल्या मागून किंवा एकदम डोक्यावरून न येता तो पुढून आला किंवा काम करणाऱ्या व्यक्तीच्या एका बाजूने आला तर जास्त बरे.

आता किचनमध्ये भिंतीवरील कपाटांमुळे प्लॅटफॉर्मवरील कामात सावली पडून अंधार पडतो यासाठी पेलमेंटमधून टी-५ लँपची प्रकाशयोजना किंवा थोडं बजेट असेल तर लीड स्ट्रीपचा वापर छान वाटतो व उपयोगी ठरतो. त्याच वेळेस किचनमधील भिंतीवरील युनिटमध्ये बाहेरून दुधी काच लावून आतमधून लो वोल्टेजची वॉर्म रंगाची प्रकाशयोजना केल्यास त्या जागेतील एकसूरीपणा कमी होतो व किचन हे उत्साही वाटते.

हे देखिल वाचा-

किचनमधील प्रकाशयोजना
Kitchen Hacks : घरात झालाय मुंग्याचा सुळसुळाट? हे उपाय करा मुंग्या स्वत:च घर सोडून जातील!

किचनमध्ये सिंक साफ करणे ही क्रिया घडत असल्यामुळे इथे प्रकाश थेट असायला हवा. एक तर आपण जी गोष्ट स्वच्छ करतो समजा त्या भाज्या असतील किंवा एखादे ताट, त्याचे फार थोड्या वेळात निरीक्षण करून आपल्या स्वतःचे त्याच्या स्वच्छतेबद्दलचे समाधान करून घ्यावे लागते. पण ही सिंक कोपऱ्यात असल्यामुळे इथे कमी प्रकाश पडतो, तर अशा वेळेस इथे टास्क लाइटिंग करून जागेची प्रकाशघनता वाढवता येते. तर अशी ही प्रकाशयोजना जी काम करणाऱ्या व्यक्तीला उत्साही ठेवते व अॅटमॉस्फेरिक अनुभव यातून देऊन जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com