वॉलपेपर्सची अद्भुत दुनिया...

घराच्या भिंती सुशोभित करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणजे वॉलपेपर्स.
house
housesakal

घराच्या भिंती सुशोभित करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणजे वॉलपेपर्स. आपल्या आवडीच्या रंगसंगतीचे, डिझाईनचे वॉलपेपर्स वापरून संपूर्ण घरालाच एक नावीन्यपूर्ण लूक देता येऊ शकतो.

वॉलपेपरच्या वापरानं रंगांना पर्याय तर मिळतोच, शिवाय घराच्या भिंतींचं, खोलीचं आणि पर्यायानं घराचं रूप खुलतं ते वेगळंच!

गेल्या दशकापासून घर सजावटीसाठी वॉलपेपरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. इंटिरीअर डेकोरेशनमध्ये वॉलपेपरनं आपलं स्थान हळूहळू भक्कम करायला सुरुवात केली. हे वॉलपेपर भिंतीवर अशी काही जादू करतात, की भिंती जणू कातच टाकतात. वॉलपेपरची लोकप्रियता लक्षात घेऊन रंगातल्या अग्रणी कंपन्याही आता वॉलपेपर निर्मितीत उतरल्या आहेत.

यावरून वॉलपेपरची वाढती लोकप्रियता आणि उपयुक्तता लक्षात येते. वॉलपेपर अगदी दोनशे रुपयांपासून उपलब्ध असल्याने हा सजावटीचा स्वस्त आणि मस्त पर्याय ठरत आहे...

एकसुरीपणाला कात्री

भिंतींना आपण जेव्हा रंग देतो, तेव्हा प्रामुख्याने एकाच रंगाचा वापर करतो आणि एखादी भिंत दुसऱ्या रंगानं हायलाईट करतो. पण वॉलपेपरमध्ये मात्र आपण हवं ते वैविध्य आजमावू शकतो. कारण वॉलपेपर सगळ्या रंगांत आणि अनंत छटांमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय फुला-पानांपासून अगदी थ्री-डी, फोर-डी डिझाईनमध्येही हे उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही हवी तशी भिंत सजवू शकता.

खिशाला परवडणारे

तुम्ही गरजेनुसार आणि बजेटनुसार वॉलपेपर खरेदी करू शकता. कारण काही सेंटिमीटर आणि फूटमध्येही वॉलपेपर उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे तेवढे शीट तुम्ही खरेदी करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे अगदी दोनशे रुपयांपासून हे उपलब्ध आहेत. थ्री-डी किंवा फोर-डी वॉलपेपर थोडे महाग आहेत, पण त्याचा परिणामही तेवढाच सुंदर मिळतो. हे वॉलपेपर लावणं अगदी सोपं आहे. याचं तंत्र लक्षात घेतलं, तर तुम्ही स्वतःसुद्धा वॉलपेपर लावू शकता. नाहीतर तज्ज्ञ येऊनही लावून देतातच.

अगणित पर्याय

तज्ज्ञ व्यक्तींकडून वॉलपेपर लावून घेणार असाल, तर ते वॉलपेपर्सचे नमुने असणारे अल्बम तुम्हाला दाखवतात. त्यातून तुम्ही वॉलपेपरची निवड करू शकता. याशिवाय वेगवेगळ्या साईट्सवरही वॉलपेपरचे अनेक पर्याय बघायला मिळतात. कोणत्या खोलीला वॉलपेपर लावायचा आहे, हा निकष वॉलपेपर निवडीच्या बाबतीत महत्त्वाचा ठरतो.

लहान मुलांच्या खोलीसाठी कार्टूनची, गाडी, खेळण्यांची, पऱ्यांची चित्रं असणारे वॉलपेपर, स्वयंपाकघरासाठी भांड्यांची चित्रं असणारे, तर दाराबाहेर अथवा बाल्कनीसाठी विटांचं डिझाईन असणारे वगैरे पर्याय बघायला मिळतात. अगदी एम्बॉस केलेला भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्धांचा वॉलपेपरही बघायला मिळतो.

नावीन्याची झलक

प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या वॉलपेपरची निवड करून प्रत्येक खोली नावीन्यपूर्ण बनवू शकता. एकाच खोलीत दोन वेगवेगळ्या वॉलपेपरचा वापरही करू शकता. किंवा एका भिंतीला थ्री-डी वॉलपेपर लावून बाकीच्या भिंतींना रंग देऊ शकता अ़थवा साधा वॉलपेपर लावू शकता. घरात किती उजेड येतो,

त्यानुसारही वॉलपेपरचा रंग, डिझाईन ठरवू शकता. प्लेन, वुडन, लँडस्केप, ब्रिस्क, स्ट्रिप्स, फ्लोरल, थ्री डी फोम, वेगवेगळे कोट्स लिहिलेले असे अनेक पर्याय यामध्ये बघायला मिळतात. घराचं रंग-रूप बदलण्याच्या विचारात असाल, तर वॉलपेपरचा पर्याय अवश्य निवडा. हा पर्याय किफायतशीर तर आहेच, शिवाय किमयागारही!

वॉलपेपर्सची उपयुक्तता

 वॉलपेपर वॉशेबल असल्यामुळे पुसता येतात

 दर्जेदार वॉलपेपर पाच वर्षं तरी

चांगले राहता

भिंतीचा रंग गेल्यावर पोपडे पडतात, रंग देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, पण वॉलपेपर खराब झाला तर तेवढ्याच

भागात वॉलपेपरचा छोटासा तुकडा

लावता येतो

 धुळीच्या त्रासापासून सुटका

 घराच्या आकर्षकपणात वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com