पर्यावरणासाठी पुणेकर सजग!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 August 2017

यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना अनेकांकडून प्राधान्य

पुणे - ‘‘गणेशोत्सवात शाडू मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती येतात. पीओपीपेक्षा शाडू माती पाण्यात लवकर विरघळते, श्रद्धेने पूजलेल्या मूर्तीचे पावित्र्यही जपले जाते, म्हणूनच आम्ही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायचे ठरवले. आमच्या या निर्णयाचे स्वागत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडून झाले आणि त्यांनी देखील त्याचे अनुकरण केले,’’ हा अनुभव सांगत होत्या पुणे मराठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल संजीवनी अत्रे. 

यंदा बहुतांश पुणेकरांनी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अत्रे म्हणाल्या, ‘‘आम्ही तीन वर्षांपूर्वी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करायला गेलो होतो. त्या वेळी अगोदर विसर्जित झालेल्या मूर्तीवर अनेकांचे पाय पडत होते, ते पाहावत नव्हते. तसेच, काही मूर्ती पाण्यावरच तरंगत होत्या. ते पाहिल्यावर बाप्पांची मूर्ती घरीच विसर्जित करण्याचे ठरवले. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून आम्ही असेच विसर्जन करतोय आणि मूर्तीची माती झाडांना घालतो.’’

शाडूची मूर्ती कशी करावी, याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ग्रंथालयात कार्यशाळा आयोजित केली. सुरवातीला ऐंशी मुले सहभागी झाली. स्वतः मूर्ती करून तिची प्रतिष्ठापना करावी, हा विचार त्या पाठीमागे होता. माझ्याही मुलाने घरीच मूर्ती तयार केली असून, तिचीच प्रतिष्ठापना आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

शाडूची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. ती पाण्यात लवकर विरघळते. अनेक जागरूक नागरिकांची आता शाडूच्या मूर्तीला पसंती मिळू लागली आहे. गेल्या वर्षी तीन हजार, तर या वर्षी साडेतीन हजार मूर्ती नागरिक घेऊन गेले. नागरिक त्यांच्या पाल्याने केलेल्या शाडूच्या मूर्तीची देखील कौतुकाने प्रतिष्ठापना करू लागले आहेत.
- सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ

गेल्या वर्षी मी शाडू मातीच्या पाचशे मूर्ती विकल्या, यंदा सातशे विकल्या. शाडूची मूर्ती पर्यावरणसंवर्धनासाठी योग्य असल्याचे आता अनेकांना कळू लागले आहे. 
-विनय फाळके, विक्रेते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news punekar ready for environment