आठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्मा यांनी साधलेला संवाद

"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्मा यांनी साधलेला संवाद

प्रश्‍न : प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांबरोबरच चित्रपटांमध्येही जोरदार कामगिरी करत असताना मध्येच संगीत नाटकात कसा? 

अमेय ः आठ वर्षांपूर्वीही मी संशयकल्लोळ नाटकात फाल्गुनरावांचीच भूमिका साकारली होती. शिवाय, "कट्यार काळजात घुसली' आणि "मानापमान'मध्येही काम केलं होतं. संगीत नाटकांशी माझी ओळख झाली तीच मुळात राहुल देशपांडेमुळे. या नाटकांची भाषा आणि संगीत फार वेगळं वाटलं. अतिशय भावलं. नाट्यसंगीत या प्रकाराशी नातं जुळलं ते राहुलमुळेच. त्याच्या सहवासात संगीत नाटकात काम करण्याचा, त्या मंतरलेल्या वातावरणाचा जबरदस्त अनुभव घेता आला. ज्या मित्रामुळे हे सारं घडलं त्याचं आयोजन असलेल्या या संगीतोत्सवात आठ वर्षांनंतर पुन्हा तीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा फार आनंद वाटतो. वसंतोत्सवात माझा सहभाग पहिल्यांदाच आहे. 

प्रश्‍न : आता पुन्हा संगीत नाटकात काम सुरू करणार आहेस का? 
अमेय ः ही एका प्रयोगापुरतीच भूमिका आहे. मात्र, पूर्वी केलेल्या जोरदार तालमींमुळे माझे संवाद सहज आठवत गेले. पोहणं येणाऱ्याला जसं कितीही काळाचं अंतर पडून पोहायला लागलं तर तो मागचं न विसरता पोहायला लागेल तसं घडलं. दरम्यान, कलाकार म्हणून माझीही समज पूर्वीपेक्षा वाढली. तेव्हा मी एकवीस-बावीस वर्षांचा होतो. आतापर्यंतच्या निरनिराळ्या भूमिकांमुळे या भूमिकेची जाण वाढलेली आहे. रसिकांसमोर या भूमिकेत यायला मीही उत्सुक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight years later Ameyeya again performed in the music drama