पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस काल खबरदारीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या होत्या. ही वाहतूक सकाळी सुरू करण्यात आली. मात्र नाशिक महामार्गावरील वाहतूक आजही बंद ठेवण्यात आली होती. काही संघटनांनी सोलापूरमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र या मार्गावरील सेवा सुरळीत सुरू होती. एसटी वाहतुकीबरोबर पीएमपीच्या वाहतुकीवर आंदोलनाचा परिणाम झाला. पीएमपीच्या अनेक बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आंदोलनाची झळ
पीएमपी - पीएमपीच्या १२ बस आणि भाडेत्त्वावरील चार बसचे ८७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बस सेवा बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
टॅक्सी - प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दोन दिवसांत पुणे-मुंबई टॅक्सी सेवा ठप्प आहे. टॅक्सीच्या २५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
चाकण आंदोलनात एसटीच्या १२ बस पूर्णपणे जाळण्यात आल्या आहेत; तर काही बसची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी सेवा बंद ठेवावी लागल्याने साधारणपणे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले, तर बस जाळल्यामुळे ५० लाख रुपयांहून जास्त नुकसान झाले आहे. मंगळवारी नाशिक वगळता अन्य मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
- यामिनी जोशी, पुणे विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
अशी होती बसस्थानकांवरील परिस्थिती....
शिवाजीनगर एसटी स्थानक
औरंगाबाद, नगर आणि दादर मार्ग सुरळीत सुरू
ग्रामीण भागातील वाहतूकही सुरळीत
नाशिक मार्ग बुधवारी बंद राहण्याची शक्यता
स्वारगेट स्थानक
कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली मार्गावरील वाहतूक सुरळीत
सोलापुरात बंदची हाक, तरीही वाहतूक सुरळीत
पुणे स्टेशन स्थानक
पुणे- मुंबई दरम्यान नियमित फेऱ्यांपैकी २३ फेऱ्या रद्द
परळ स्थानकामधून दुपारनंतर बस सोडणे बंद
फलटण, मिरज, महाबळेश्वर आणि सांगलीची वाहतूक सुरळीत