#SaathChal ‘साथ चल’मध्ये सहभागी व्हा अन्‌ जिंका लाखाचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

असे व्हा स्पर्धेत सहभागी....
यंदा ‘साथ चल’ उपक्रमाला गीत, संगीत अन नृत्याची जोड दिली आहे. आपण जगात कुठेही असा, विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांबरोबर जोडून घेण्याची ही संधी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा एक व्हिडिओ बनवून तो ‘सकाळ’कडे शेअर करायचा आहे. गीत, संगीत वा नृत्याचा आविष्कार असणारा तुमचा कुटुंबीयांसोबतचा व्हिडिओ एखाद्या पारंपरिक रचनेवर आधारित असावा.

आपल्या देशाला समृद्ध परंपरांचा वारसा लाभला आहे. आपली संस्कृती जोपासण्यामध्ये कुटुंबसंस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे.  कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘इंडियन रागा’ या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे. 

सातशेहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरीच्या वारीमध्ये विठुभक्त सहभागी होत आहेत. याच परंपरेचा सन्मान करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासह एकत्र यावे, अशी कल्पना आहे. आपल्या विश्‍वासार्हतेने महाराष्ट्राच्या मनात गेली ८७ वर्षे आपले अढळस्थान निर्माण करणाऱ्या ‘सकाळ’ने वारीच्या निमित्ताने गेल्या वर्षापासून ‘साथ चल’ उपक्रम सुरू केला अन्‌ त्यात आपल्या कुटुंबासमवेत वारीबरोबर काही अंतर चालण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा या उपक्रमात अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

असे व्हा स्पर्धेत सहभागी....
यंदा ‘साथ चल’ उपक्रमाला गीत, संगीत अन नृत्याची जोड दिली आहे. आपण जगात कुठेही असा, विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांबरोबर जोडून घेण्याची ही संधी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा एक व्हिडिओ बनवून तो ‘सकाळ’कडे शेअर करायचा आहे. गीत, संगीत वा नृत्याचा आविष्कार असणारा तुमचा कुटुंबीयांसोबतचा व्हिडिओ एखाद्या पारंपरिक रचनेवर आधारित असावा. 

येथे पाठवा व्हिडिओ...
मोबाईल क्रमांक - ९१३००८८४५९

भरघोस बक्षिसे...
प्रथम - एक लाख रुपये
द्वितीय - ७५ हजार रुपये
तृतीय - ५० हजार रुपये
उत्तेजनार्थ - १० हजार रुपये. (दहा बक्षिसे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SaathChal Aashadhi Wari Palkhi Sohala Dindi Involve Gift Indian Raga Sakal