esakal | पाणीदार वरवंड भागवणार पालखी सोहळ्याची तहान
sakal

बोलून बातमी शोधा

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

पाणीदार वरवंड भागवणार पालखी सोहळ्याची तहान

sakal_logo
By
सचिन शिंदे

उंडवडी (जि. पुणे) ः  गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील दौंड तालुकातील वरवंड गावान कमालीच काम केले आहे. मुळातच पाणीदार असलेल्या गावाने तलावाव्दारे नेत्रदीपक समृद्धी साधली आहे. पालखी सोहळ्याचीही पुढील अनेक वर्षांची तहान तलाव भागवणार असल्याचे सहज जाणवते.

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी उंडवडीकडे मार्गस्थ झाला. सोहळ्याने बिकट रोटी घाट ढगाळ वातावरणातच पार केला. विठुरायाचा गजर व हरिनामचे भजन गात सोहळ्यातील वारकऱ्यांनी घाटाचा रस्ता पार केला. वाटेत भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रथाला सहा बैलजोड्या लावण्यात आल्या. घाटात समाज आरती पार पडली व सोहळा मार्गस्थ झाला. वरवंडला सोहळा विठ्ठल मंदीरात विसावला होता. त्याच्या डाव्याच बाजूला भले मोठ तळ दिसले. सहज चौकशी केली तर त्या तळाचे काम श्रमदानातून झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा सामुदायिक नेतृत्वातून समृद्ध होणार गाव भेटल. गावाचा उंबरा अागदी चार हजारांचा. लोकसंख्या लगबग वीस हजारांचीच. गाव बागायत. ऊसामुळे समृद्धतता नांदतेय असे वरवंडचे वैशिष्ठ्य आहे. गावाला कधीच पाण्याची कमतरता नव्हती. मात्र 2015-16 मध्ये पाऊस कमी झाला अन् गावान पाण्याची कमतरता दुष्काळाच्या रूपात अनुभवली. अर्थात तेथेच पाणी साठवणूकीच बीज रोवल गेले. त्या कामासाठी गावातील वीस एक तरूण पुढे आले. त्यांना गावातील चांभार तळ पुन्नरूज्जीवीत करण्याचा संकल्प ग्रामसभेत बोलून दाखविला. गावाला विचार पटला त्यांनी साथ दिली. गावान खोदकाम सुरू केले. शेतकऱ्यांनी काळी माती उपसून नेली. खोलीकरणासाठी तरूण सगळ्यांना भेटले. त्यात पहिल्यांदा ग्रामपंचायत तयार झाली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जुने तलाव खोलीकरणास पोकलेन व यंत्रे दिली. आमदार राहूल कुल यांनीही वाहनांसह यंत्र सामग्री दिली. पाटबंधारे व जलसंपदा खाते ताकदीने काम करू लागले. गावान डिझेलचा खर्च उचलला.

वीस तरूणांनी सुरू केलेल्या कामाला गावान साथ दिली अन बघता बघता चार महिन्यात बारा एकराचे मोठे तलाव तयार झाले. तलावाची खोली किमान अठरा फुट आहे. तलाव गोल असून त्याच्या भोवती माप घेण्यासाठी दुचाकी फिरवली तर त्याचे माप परफेक्ट सव्वा किलोमीटर भरले. लांबी रूंदी गावान त्यांच्या पद्धतीने काढली. जलसंपदा व पाटबंधारे खात त्यावर काम करत आहे. मोजलेल्या मापानुसार सध्या तेथे पाणी साठू लागले आहे. पावासाची प्रतिक्षा आहे. तलाव क्षमतेने भरला तर तेथे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी साठणार आहे.  आत्तापर्यंत पन्नास लाखाचा खर्च झाला आहे. व्हिक्टोरिया तलावानंतर नव्याने झालेला या तलावात साठणार पाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तहान तर भागवणार आहेच. त्याशिवाय आजूबाजूच्या गावातही पाणीदार समृद्धी आणणार हेच नक्की.