मधमाश्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

टाकवे बुद्रुक : आग्या मोहोळाच्या माशांनी केलेल्या हल्ल्यात आंदर मावळातील कोंडिवडेच्या शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानू बारकू लामगण (वय 50) वर्षे असे या दुर्देवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पाश्चात चार विवाहित मुली असून त्यांचे आज पितृछत्र हरपले, 20 वर्षांपूर्वी या लेकी आईच्या छत्रालाही पोरक्या झाल्या होत्या. 

शुक्रवारी (ता.23) ज्ञानू लामगण गावाच्या पश्चिमेस असलेल्या आंब्याच्या माळरानात मशागतीचे काम करीत होते, कामाच्या वेगात त्यांचे इकडे तिकडे लक्ष गेलेच नाही. जवळच्या झाडावर मोठे आगे मोहोळ होते, मोहळाच्या माशांनी अकस्मितपणे लामगण यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, शरीरावर माशांनी असंख्य चावे घेतले. जीवाच्या आकांताने ओरडणारे लामगण यांचे चिंधू आणि विलास हे दोन भाऊ तेथेच काम करीत होते. माशा किती दूर करण्याचा प्रयत्न केला तरी जात नव्हत्या,आरडाओरड सुरूच होता. जवळच्या शेततळ्यातील पाण्यात उडी मार असे दोन्ही भावांनी ज्ञानूला ओरडून सांगितले. जखमी ज्ञानू यांना पोहता येत होते, त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यांच्यावर चवताळून आलेल्या माशांनी तेथून पोबारा केला. 

दोन्ही भावांनी जखमी ज्ञानूला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत त्यावर उपचार सुरू होते, मानेवर गळ्यावर माशांनी घेतलेल्या चाव्यांमुळे त्यांच्या श्वसनाचा त्रास वाढू लागला आणि शेवटी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: 1 died in honeybees attack

टॅग्स