एका पथदिव्यासाठी तब्बल एक लाख रूपये...

मिलिंद संगई
सोमवार, 2 जुलै 2018

बारामती (पुणे) : शहरातील पथदिव्याच्या एका खांबाची किंमत किती असू शकेल? सामान्य माणसाचे अंदाजही सामान्यच असतात, मात्र बारामती नगरपालिकेने पथदिवे बसविण्यासाठी जो खर्च केला आहे, त्या नुसार एका पथदिव्यासाठी नगरपालिकेने एक लाख रुपये खर्च केले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव यांनीच आज नगरपालिकेत या विषयाचा खुलासा केल्यानंतर अनेक नगरसेवक अवाक झाले. 

पथदिव्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेताना सचिन सातव यांनी शहरात बसविण्यात आलेल्या चारशे खांबांच्या कामासाठी बारामती नगरपालिकेने तब्बल चार कोटी रुपये मोजल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. 

पथदिव्यांबाबत एलईडी दिवे बसविण्याबाबत शासकीय परिपत्रकाबाबत नगरसेवक संजय संघवी यांनी मुद्दा उपस्थित केला. या विषयावर बोलताना सातव यांनी ही बाब उघड करत या पुढील काळात इतका मोठा खर्च अशा खांबांवर करण्यापेक्षा लोखंडी खांब बसविल्यास नगरपालिकेच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत राज्य शासनाने काढलेला अध्यादेश व सुधारित अध्यादेश हा नगरपालिकेच्या स्वायत्ततेवर गदा आणणारा आहे, या संदर्भात विधीमंडळाच्या येणा-या अधिवेशनात आवाज उठविण्याची विनंती अजित पवार यांना केली असल्याचे गुजर म्हणाले. 

सुनिल सस्ते यांनीही ही रक्कम महावितरणकडे वर्ग करुन टाकल्याने त्यांनी काम उरकण्यासाठी काहीही शहानिशा न करता हे पैसे खर्च केल्याचा आरोप करत या पुढील काळात नगरपालिकेने स्वतः ही कामे करायला हवीत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title: 1 lakh rupees for one streer light in baramati