रिक्षाच्या धडकेत महिलेचा मृत्यू 

संदीप घिसे 
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील रिक्षाने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी येथे शुक्रवारी (ता.18) सकाळी घडली. 

शीला सुरेश कदम (वय 40 रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शीला या पायी कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी, येथे आल्या असता भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने (एमएच-12- जे.एस.-8954) जोरदार धडक दिली. या अपघातात शीला या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Web Title: 1 woman died in auto accident