पुण्यातील दत्तवाडीत मध्यरात्री दुचाकींची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी येथील दांडेकर पूल परिसरात आंबील ओढा वस्तीमध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी दहा ते बारा दुचाकींचे नुकसान केले.

पुणे : दत्तवाडी येथील आंबील ओढा वस्तीमध्ये काही अज्ञात तरुणांनी लोखंडी रॉडने दहा ते बारा दुचाकी फोडल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी येथील दांडेकर पूल परिसरात आंबील ओढा वस्तीमध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी दहा ते बारा दुचाकींचे नुकसान केले. अंतर्गत वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. ही घटना सीसीटीव्हीत झाली असून, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 to 12 two wheeler damaged by unknowns at Dattawadi Pune