महाराष्ट्रातील दहा लाख मुलांना जागतिक स्तरावर रोजगाराची संधी देणार - हणमंतराव गायकवाड

बीव्हीजीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम- हणमंतराव गायकवाड
Job Opportunity
Job Opportunityesakal

Baramati News : आगामी काही वर्षात महाराष्ट्रातील पदवीप्राप्त दहा लाख विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराची संधी मिळवून देण्याची महत्वाकांक्षी योजना बीव्हीजीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांनी आखली आहे. या साठी राज्यातील 170 महाविद्यालय व विद्यापीठांशी प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनरशीपचा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती हणमंतराव गायकवाड यांनी दिली.

या बाबत बोलताना हणमंतराव गायकवाड म्हणाले, जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करुन देणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. सध्या आम्ही सौदी अरेबिया, कुवेत, कतार, तैवान, जपान व कोरिया या ठिकाणी काम सुरु आहे, काही ठिकाणी आगामी सहा महिन्यात काम सुरु होणार आहे. जी मुले नोकरीक्षम आहेत, अशा मुलांना तयार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण व संधीची माहिती देण्याचे काम करीत आहोत.

बीव्हीजीच्या माध्यमातून तांत्रिक व अतांत्रिक क्षेत्रासह सेवाक्षेत्रातील रोजगाराच्या संधी महाराष्ट्रातील मुलांना मिळवून देण्याचा यामागचा प्रमुख उद्देश आहे. जागतिक स्तरावर ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आहे, भाषेवर प्रभुत्व आहे,

संभाषणकौशल्य असेल, विज्ञान व वाणिज्य क्षेत्रासह तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यात अधिक वाव असेल. पदवीनंतर ही संधी मिळू शकते. आगामी दहा वर्षात दहा लाख विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराची संधी देण्याचे उद्दीष्ट आम्ही निश्चित केले आहे.

व्यावसायिक स्तरावर लागणारे विद्यार्थी क्रीडाक्षेत्रातून प्राधान्याने आम्ही निवडू, काम करुन घेण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांनाही यात संधी मिळेल. अकौंट, नर्सिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासह विविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना संधी मिळेल. विद्यार्थी निवडताना गरजू मुलांना प्राधान्याने संधी देण्याची आमची संकल्पना आहे.

महाराष्ट्रातील मुलांनी आता जागतिक स्तरावर जायला पाहिजे, या उद्देशाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनी, सौदी अरेबिया, तैवान यासह इतरही अनेक देशांमध्ये आगामी काही वर्षात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ही संधी ओळखून हा प्रकल्प हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविदयालयानेही प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर या सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने जागतिक स्तरावरील रोजगाराचे दालन खुले होईल, असे हणमंतराव गायकवाड यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com