Pune Ganesh Visarjan: विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताय ? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी

क्षेत्रीय कार्यालयांकडून हौद, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्याची व्यवस्था
10 thousand employees pune Municipality ready for Ganesh visarjan Anant Chaturdashi 2023
10 thousand employees pune Municipality ready for Ganesh visarjan Anant Chaturdashi 2023 sakal

पुणे : पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्य विसर्जन मिरवणुकीसह घरोघरी मूर्ती विसर्जनाचे प्रमाण मोठे असते. त्या दृष्टीने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत लोखंडी टाक्या, विसर्जन हौद, फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. व्यवस्थापनासाठी महापालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतात. त्यामुळे महापालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता, औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपिंग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर,

अग्निशामक दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणाही ठिकठिकाणी लावली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि सांडपाणी वाहिन्या तुंबू नयेत यासाठी उपअभियंता व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

याकडे लक्ष द्या

  • कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १०१ या क्रमांकावरून अग्निशामक दलाशी संपर्क साधा

  • गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरीपासून लांब उभे करा

  • नाव, होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नका

  • महापालिकेतर्फे नदीकाठी जीवरक्षक नियुक्त केले आहेत, त्यांच्याकडून मूर्तीचे विसर्जन करवून घ्या

  • एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास जीवरक्षकांना तातडीने माहिती द्या

  • पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरा

  • अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या हौदातच करा

आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक

०२०-२५५०१२६९ ०२०-२५५०६८००, १, २, ३, ४

गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ः ९६८९९३१५११

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी ः ८१०८०७७७७९ आणि ०२०-२६४५१७०७

अग्निशामक दल : १०१

पोलिस हेल्पलाइन क्रमांक

नियंत्रण कक्ष : १००/११२

ज्येष्ठ नागरिक : १०९०

चाइल्डलाइन : १०९८

महिला हेल्पलाइन : १०९१

व्हॉट्सॲप : ८९७५२८३१००

वैद्यकीय ससून रुग्णालय :

०२०-२६१२८०००

रुग्णवाहिका : १०८

येथे आहेत प्रमुख विसर्जन घाट

  • संगम घाट

  • वृद्धेश्वर घाट/ सिद्धेश्वर घाट

  • अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)

  • बापूघाट (नारायण पेठ)

  • विठ्ठल मंदिर (अलका चौक)

  • ठोसरपागा घाट

  • राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर

  • चिमा उद्यान येरवडा

  • वारजे कर्वेनगर, गल्ली क्रमांक १ नदी किनार

  • नेने/आपटे घाट

  • ओंकारेश्वर

  • पुलाची वाडी, नटराज चित्रपटगृहामागे

  • खंडोजी बाबा चौक

  • गरवारे महाविद्यालयामागील बाजू

  • दत्तवाडी घाट

  • औंधगाव घाट

  • बंडगार्डन घाट

  • पांचाळेश्वर घा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com