पुणे : केडगावातून केरळसाठी 10 टन तांदूळ रवाना

रमेश वत्रे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

केडगाव (पुणे) : बोरीपार्धी, चौफुला, केडगाव (ता.दौंड) येथील ग्रामस्थांकडून केरळ पुरग्रस्तांसाठी दहा टन तांदूळ आज रवाना करण्यात आला. अशी माहिती संयोजक आनंद काकासाहेब थोरात यांनी दिली. 

केरळ पुरग्रस्तांसाठी बोरीपार्धी- केडगावमधून मदत फेरी काढण्यात आली. या मदतीतून दहा टन तांदूळ जमा झाला. या मदतीसाठी आनंद थोरात व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला. हा तांदूळ तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या उपस्थितीत टेस्टी बाईट या कंपनीकडे सुपुर्त करण्यात आला. टेस्टी बाईट कंपनीच्या माध्यमातून ही मदत केरळ पुरगस्तांना दिली जाणार आहे.

बोरीपार्धी, चौफुला, केडगाव स्टेशन येथे मदत फेरी काढण्यात आली. यात रोख रकमेशिवाय आनंद काकासाहेब थोरात, अनुराज कारखान्याचे कार्यकारी संचालक डॅा. माणिक बोरकर, काकासाहेब थोरात पतसंस्था, केडगाव व्यापारी असोसिएशन, यशराज एंटरप्रायजेसचे सुनील सोडवनर, शिवकमल डेव्हलपर्सचे सुमित टिळेकर यांचा प्रत्येकी एक टन तांदूळ तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, धनलक्ष्मी पतसंस्था, साधना सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कोळपे यांच्याकडून प्रत्येकी अर्धा टन तांदूळ यावेळी देण्यात आला. कुमार ड्रेसर्सचे किशोर सुंद्राणी यांच्याकडून कपडे तर म्हेत्रे बुकचे राहुल म्हेत्रे यांच्याकडून वह्या व पेन देण्यात आले. दौंड तालुका मेडीकल असोसिएशनच्यावतीने 100 किलो औषधे देण्यात आली. टेस्टी बाईट कंपनीच्यावतीने 40 हजार फुड पॅक या अगोदर देण्यात आल्याचे कंपनीचे व्यवस्थापक शंकर चक्रवर्ती, रोहिदास राजपुरे यांनी यावेळी सांगितले. 

तहसीलदार सोमवंशी म्हणाले, बोरीपार्धी-चौफुला-केडगावच्या ग्रामस्थांनी मानवतेचा धर्म पाळत चांगले काम केले आहे.  अन्य गावांनी त्यांचे अनुकरण करावे. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले, या देणगीदारांनी राष्ट्र कार्य करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. यावेळी काकासाहेब थोरात पतसंस्थेचे अध्यक्ष वामन जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश अगरवाल, केडगाव व्यापारी असोसिएशनचे संतोष शिलोत आदी उपस्थित होते.  

Web Title: 10 tonne rice for kerala flood victims from kedgaon pune