#व्हॅक्‍सीनेशन : गोवर रुबेलाच्या लसीकरणामुळे १० वर्षांच्या मुलीस पॅरालिसीस ?

संदिप जगदाळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे (हडपसर) : गोवर रुबेलाची लस दिलेल्या १० वर्षांच्या मुलीस पॅरालिसिसचा त्रास झाला असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शनिवारी लस दिल्यानंतर त्या मुलीस त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या कुटूंबीयाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने महापालिकेने मुलीच्या उपचाराचा खर्च उलचावा अशी मागणी पालकांनी केली आहे.  

पुणे (हडपसर) : गोवर रुबेलाची लस दिलेल्या १० वर्षांच्या मुलीस पॅरालिसिसचा त्रास झाला असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शनिवारी लस दिल्यानंतर त्या मुलीस त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या कुटूंबीयाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने महापालिकेने मुलीच्या उपचाराचा खर्च उलचावा अशी मागणी पालकांनी केली आहे.  

केंद्र सरकारक़डुन दिल्या जाणाऱ्या गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची पुण्यातील सात विद्यार्थ्यांना ‘रिअॅक्‍शन’ आल्याची माहिती काल समोर आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
 

 आज आणखी एका मुलीला गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची ‘रिअॅक्‍शन’  झाल्याची माहिती मिळाली आहे. श्र्वेता संतोष कांबळे असे उपचार घेत असलेल्या मुलीचे नाव आहे. ती विठ्ठलनगर येथील कै. निवृत्ती तुकारम पवार या महापालिकेच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत आहे. शनिवारी तिला रूबेलाची लस देण्यात आली होती.

मुलीचे वडील संतोष चांगदेव कांबळे म्हणाले, ''लस देण्यापूर्वी माझ्या मुलीला कोणताही त्रास नव्हता. पालक सभेत लस घेतल्यानंतर ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये असे सांगण्यात आले होते. श्र्वेता हिला शनिवारी रात्री ताप आला. मात्र शाळेत सांगितल्यामुळे आम्ही त्याचा जास्त विचार केला नाही. रविवारी व सोमवारी तिला ताप होता. तिला उठता बसता येत नव्हते. त्यामुळे मंगळवारी आम्ही माळवाडी येथील सानेगुरूजी रूग्णालयात घेवून गेलो. यावेळी रूग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला व ससूनमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही मुलीला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साडेसहा हजाराचे एक इंजेक्शन आम्हाला डॅाक्टरांनी आणायला सांगितले. कसे तरी पैसे गोळा करून ते इंजेक्शन आणले. डॅाक्टरांनी मुलीला पॅरॅलीसीस झाल्याचे सांगितले आहे. माझी मुलगी लस देण्यापूर्वी ठणठणीत होती. त्यामुळे महापालिकेने माझ्या मुलीच्या उपचाराचा खर्च उचलावा.''

श्र्वेताचे वडील हे पूर्वी पेंटीग व्यवसाय करत. मात्र अपघातात त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. तीची आई धुण्याभांडयाची कामे करते. दरम्यान ''मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असून उपचारासाठी एका इंजेक्शनचा खर्च 14000 रुपये इतका आहे. तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेने करावा'' अशी मागणी चेतन तुपे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

Web Title: 10 year old girl paralysis due to govar rublela vaccination ?