विवाहितेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी

वैद्यकीय आणि केमिकल ऍनालिसिसचा अहवाल, पोलिस तपास आणि सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने निकाल सुनावली
10 years Servitude for throwing acid on married womans face pune
10 years Servitude for throwing acid on married womans face pune

पुणे - ‘तु मेरी नही हो सकती, तो किसी की भी नही’ असे म्हणत अल्पवयीन विवाहितेवर नायट्रिक ॲसिड फेकणाऱ्याला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्यात मुलगी फितूर झाली होती. मात्र वैद्यकीय आणि केमिकल ऍनालिसिसचा अहवाल, पोलिस तपास आणि सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल सुनावली.

विशेष न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. अबुकर अयाझ तांबोळी (वय २०, रा. पर्वती दर्शन) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय विवाहितेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी पर्वती दर्शन येथील सार्वजनिक शौचालयाजवळ हा प्रकार घडला. विवाहिता माहेरी गेली असता घटनेच्या दिवशी तांबोळी तेथे गेला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती त्याला लग्न झाले आहे, असे त्याला समजावून सांगत होती.

त्यावेळी त्याने ‘तु मेरी नही हो सकती, तो किसी की भी नही’ असे म्हणत मुलीच्या चेहऱ्यावर नायट्रिक ऍसिड फेकले. या ऍसिड हल्ल्यात ती जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सपताळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून मुलीला देण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.

१३ पैकी सात साक्षीदार फितूर

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड. जावेद खान यांनी पाहिले. त्यांनी तपासलेल्या १३ पैकी सात साक्षीदार फितूर झाले. मुलीचा देखील त्यात समावेश होता. मात्र ॲड. खान यांनी घेतलेल्या उलटतपासणीमध्ये तिने सर्व घटना सांगितली होती. त्याबरोबर वैद्यकीय आणि केमिकल ऍनालिसिसचा अहवाल महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार किशोर तोंडे, एस. सी. घिसरे आणि पी. सी. खन्ना यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com