पुण्याची पोरं हुश्शार; 100 उत्कृष्ट स्टार्टअपमध्ये 21 प्रोजेक्ट

Startup
Startup

पुणे - तरुणांच्या नवनवीन कल्पनांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे (एमएसआयएनएस) आयोजित केलेल्या स्पर्धेत पुण्यातील 21 स्टार्टअपने पहिल्या 100 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तर सर्वाधिक प्रकल्प हे मुंबईतील आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशभरातील 1 हजार हजार 600 स्टार्टअपने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील महाराष्ट्रचे सर्वाधिक 60 प्रकल्प निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्रनंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकचे 10 स्टार्टअप निवडण्यात आले आहेत.

निवड झालेल्या 100 पैकी 24 स्टार्टआपला राज्य सरकारकडून प्रत्येकी 15 लाख रुपये देण्यात येणार आहे. या पैशातून स्टार्टअपने त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादने बनवून ती सरकारच्या विविध विभागांना उपलब्ध करून द्यायची आहेत. तरुणांच्या नवकल्पनांना निधी मिळाल्याने स्टार्टअपला बळ मिळणार आहे. तसेच त्यांनी तयार केलेल्या उत्पादनातून नवनवीन संकल्पना राज्य सरकारला राबवता येणार आहे. पुण्यातून निवड झालेले प्रकल्प शेती, आरोग्य शिक्षण, कचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास स्मार्ट इन्फ्रा, मोबिलिटी अशा विविध क्षेत्रांमधील आहेत. यातील काही प्रकल्प पहिल्या 24 मध्ये आले तर स्टार्टअपला बुस्टर देणे शक्य होणार आहे.

पुण्यातून निवडण्यात आलेल्या स्टार्टअप
1) शेती
SENSE IT OUT,INTELLIGENT SOLUTIONS PVT LTD
AGRIMA EXIM PRIVATE,LIMITEDA
Pentafield Agro and Foods Pvt. Ltd.

2) मोबॉलिटी 
VROOM Power Pvt. Ltd.
Yasm bikes services & Solutions Pvt Ltd
Envigreen Bikes Private Limited

3) स्मार्ट इन्फ्रा
Avatron Industries Pvt Ltd 
Feronex Smart Logistics Pvt. Ltd.

4) स्वच्छ ऊर्जा
KrishnaArya Tech Corp LLP
Suryalogix Private Limited

5)कचरा
Fluid Robotics Private Limtied

6) शिक्षण
Clairvoyance Mindware Private Limited
Design Derivatives
Bleetech Innovations Pvt Ltd 

7) कौशल्य विकास
SPA TECHNICAL ADVISOR

8) आरोग्य Jeevtronics Pvt Ltd

9) गव्हरनन्स 
Arnekt Solutions
PVKL Tech Services Private ltd
Snapper Future Tech Pvt Ltd 

10)संकीर्ण 
Securematix Technologies LLP
KBCols Sciences Pvt Ltd.

राज्यनिहाय निवडण्यात आलेले स्टार्टअप -
आंध्रप्रदेश - 03
दिल्ली - 05
गुजरात - 04
हरियाणा - 03 
झारखंड -  01
कर्नाटक - 10 
केरळ - 02
मध्यप्रदेश - 03
महाराष्ट्र - 60
पंजाब - 01
राजस्थान - 02
तमिळनाडू - 02
उत्तर प्रदेश - 04 
एकूण -100

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com