Pune : खडकवासला जलाशयाचे जल प्रदूषण रोखण्यात शंभर टक्के यश

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मानवी साखळीच्या माध्यमातून प्रबोधन करत खडकवासला जलाशयाचे होणारे जल प्रदूषण रोखण्यात शंभर टक्के यश आले असून 22 व्या वर्षी देखील हा प्रकल्प हे अभियान यशस्वीपणे पार पडले.
100 percent success in preventing water pollution of Khadakwasla 22nd year of successful campaign of yashasvi
100 percent success in preventing water pollution of Khadakwasla 22nd year of successful campaign of yashasviSakal

सिंहगड रस्ता : धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मानवी साखळीच्या माध्यमातून प्रबोधन करत खडकवासला जलाशयाचे होणारे जल प्रदूषण रोखण्यात शंभर टक्के यश आले असून 22 व्या वर्षी देखील हा प्रकल्प हे अभियान यशस्वीपणे पार पडले.

धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी खडकवासला जलाशयाचे रक्षण हे अभियान सलग बाविसाव्या वर्षी यशस्वी करण्यात आले.  हिंदू जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरणात १.१९  टीएमसी पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यातून पुणे शहराची तहान भागवली जाते. मात्र, धुलीवंदन अथवा रंगपंचमी यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही चळवळ 22 वर्षे राबवली जात आहे. 

रंग खेळणाऱ्यांकडून जलाशयात उतरणे यासह इतर अनेक अप प्रकार होतात हे थांबवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि खडकवासला ग्रामस्थ तसेच समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवले जाते.

 श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कृष्णा पाटील, जालिंदर सुतार, अशोक कडू, सारंग राडकर, पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भानुदास खुटवड,

हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, यांच्यासह इतर मान्यवर आणि दीडशेहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. ३० मार्च ल देखील अभियान पुणे, पिंपरी-चिंचवड, भोर, सासवड अशा विविध भागातून 40 हून अधिक ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाने  उत्तम सहकार्य या अभियानास केले.

तसेच पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक ही लावण्यात आले होते. रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 30 मार्चला देखील हे अभियान राबवण्यात येणार आहे.  नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचा आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com