अहो, कोरोनो-कोरोना काय करताय, पुण्यातील पाणीसाठ्याकडेही लक्ष द्या!..

khadak.jpg
khadak.jpg

पुणे : आज शहराला पाणी पुरविणाऱ्या चारपैकी तीन धरणांमध्ये मिळून १०.४२ टीएमसी पाणीसाठा राहिला आहे. एक धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या मते शहर व ग्रामीण भागासाठी समन्यायी पाणीवाटप करण्यात आले आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. उर्वरित तीन धरणांमध्ये १० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत धरणात ४.९२, वरसगाव धरणात ४.१७ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.३१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

तसेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. मात्र, हा अतिरिक्त पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या नियोजनापेक्षा ऑक्टोबर महिन्यापर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून उन्हाळ्यात धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागासाठी दोन सिंचन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या १० टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील चार किंवा साडेचार टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना १.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. या बाबी लक्षात घेतल्या तरीदेखील पाऊस सुरू होईपर्यंत धरणांमध्ये अडीच ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी लांबलेला पाऊस यंदा पथ्यावर पडला असून पुणेकरांसाठी सध्या मुबलक पाणी उपलब्ध आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात जवळपास ५० टक्के पाणीसाठा असून जुलैअखेरीपर्यंत तो पुरेल, असा विश्वास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून पाण्याविषयी तक्रारी खूपच कमी झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com