महत्त्वाची बातमी : मु्ंबई-पुण्याबाबत पसरली अफवा; पोलिसांनी केला खुलासा

crime.jpg
crime.jpg

पुणे ः "मुंबई-पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने या दोन्ही शहरात आता निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले आहे,' अशा प्रकारचा मेसेज व्हाटस्‌अप, फेसबुकवर व्हायरल झाला आहे. हा मेसेज खोटा असून नागरीकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, तसेच खोटे मेसेज व्हायरल करू नयेत, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत खोटी माहिती पसरविणे व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात. त्यादृष्टीने पुण्यात दोघांविरुद्ध अशा प्रकारे गुन्हे दाखल झालेले आहेत. असे असतानाही व्हॉटसअप, फेसबुक यांसारख्या सोशल मिडीयाद्वारे खोटी माहिती पसरविण्याचे प्रकार कमी होत नसल्याची सद्यस्थिती आहे.

शहरातील अनेकांच्या मोबाईलवर "मुंबई व पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून राज्य सरकारने आता थेट निमलष्करी दलाला पाचारण केले आहे. हे दल केव्हाही येऊ शकते, त्यामुळे खरेदी करून ठेवा.'' अशा प्रकारचे मेसेज व्हॉटस्‌अप, फेसबुकवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, य़ामुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अनेकांनी याविषयी "सकाळ'कडे विचारणा केली. याविषयी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, "व्हायरल झालेला संबंधीत मेसेज खोटा आहे. नागरीकांनी अशा खोट्या माहितीवर व अफवांवर विश्‍वास ठेवू नये. या स्वरुपाची खोटी माहिती प्रसारीत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली जाते.'' 

- 'कर्जमाफीचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना...'; उपमुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली 'ही' मागणी!

खोटी माहिती, व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्यांबाबत करा इथे तक्रार 
* पोलिस नियंत्रण कक्ष - 100 
* सायबर पोलिस ठाणे - 020 29710097 
* ईमेल - crimecyber.pune@nic.in 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com