esakal | Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं
sakal

बोलून बातमी शोधा

Grandmother_Corona

या आजीबाईंना कोरोनाची लागण झाली. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात महिनाभरापूर्वी पर्यंत अनेक खाजगी व सरकारी कोविड रुग्णालये कार्यरत होती.

Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पुणे) : संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोना महामारीच्या संसर्गाने, गरीब-श्रीमंत, जात-पात, लहान-थोर, ग्रामीण-शहरी अशा सर्व सीमा ओलांडल्या आहेत. संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या महाभयंकर आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या शेकडो कोविड योद्ध्यांनीही आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आश्चर्य म्हणजे आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील १०५ वर्षाच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती आणि उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव आहे.

- हे ही वाचा : गुलाबी थंडीतही व्यायामासाठी सायकलिंगला ग्रामीण भागातही पसंती

या आजीबाईंना कोरोनाची लागण झाली. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात महिनाभरापूर्वी पर्यंत अनेक खाजगी आणि सरकारी कोविड रुग्णालये कार्यरत होती; मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे त्यातली अनेक रुग्णालये कोरोनाबाधितांना भरती करून घेत नाहीत. त्यामुळे हुलावळे परिवारासमोर आजीबाईंच्या उपचाराचा मोठा प्रश्न होता. मात्र, वाकड आणि हिंजवडी परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये या आजींवर उपचार करण्यात आल्याचे त्यांचे नातू संदीप हुलावळे यांनी सांगितले.

- सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

सुनियोजित उपचारांमुळे अगदी काही दिवसातच कोरोना आजारावर आजीबाईंनी यशस्वी मात करून आजीबाई एकदम ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या. आज पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात १०० वर्ष वयाची व्यक्ती बघायला मिळणे, ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे. अतिशय विरळ लोकवस्तीचे गाव ते तासनतास वाहतूक कोंडी होणारे हिंजवडी गाव, अशा अनेक बदलांच्या शांताबाई हुलावळे साक्षीदार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top