पुणे: दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत; हत्या की आत्महत्या?

खडकवासला येथील घटना; आत्महत्या की हत्या हे शोधण्याचे पोलीसांसमोर आव्हान
10th class girl student Dead body Excitement at being found suicide or murder
10th class girl student Dead body Excitement at being found suicide or murdersakal

किरकटवाडी : खडकवासला येथे चिंतामणी हाईट्स या इमारतीच्या व्हेंटीलेशन डक्टमध्ये एका दहावीत शिकणाऱ्या मुलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हीना शब्बीर पठाण (वय 16, रा. चिंतामणी हाईट्स, खडकवासला) असे मृत मुलीचे नाव असून सर्व शक्यता गृहीत धरून हवेली पोलीसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.

दि. 1 एप्रिल रोजी रात्री उशिरा घरात दुर्गंधी येत असल्याने पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनी खिडकीतून व्हेंटीलेशन डक्टमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना मृतदेह दिसला. याच इमारतीत राहणारे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय मते यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला कळविले. हवेली पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले परंतु अंधार असल्याने डक्टमध्ये उतरणे शक्य नाही असे सांगून निघून गेले. भयभीत झालेल्या रहीवाशांनी अख्खी रात्र जागून काढली.

आज सकाळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुजित पाटील यांच्यासह अभिषेक गोणे, ओंकार इंगवले,शुभम मिरगुंडे, शुभम माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, पंकज माळी व अक्षय काळे या जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह डक्टच्या बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे अधिक तपास करत आहेत.

अवघ्या काही तासांत ओळख पटविण्यात यश

मृतदेह सडलेला असल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तसेच रहिवाशांकडूनही काही माहिती मिळत नसल्याने आणि इमारतीच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याने ओळख पटविणे अधिकच अवघड झाले होते. पोलीसांनी रहिवाशांकडे कसून चौकशी करत मृतदेहाची ओळख पटवली. सदर मृतदेह याच इमारतीत राहणाऱ्या हीना पठाण हीचा असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.

हवेली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा होता दाखल

हिनाच्या आईने 30 मार्च रोजी हवेली पोलीस ठाण्यात हिनाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल केलेली आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना पोलीसांना हिनाचे सोलापूर मध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झालेले व्हॉट्स ॲप चाटींग मिळाले आहे. त्याचा हीनाच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.

दहावीच्या दोन पेपरला होती गैरहजर

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या वर्गात शिकणारी हीना अभ्यासात अत्यंत हुशार होती. 30 मार्च रोजी विज्ञान भाग एक आणि 1एप्रिल रोजी झालेल्या इतिहासाच्या पेपरला ती गैरहजर होती. तीचा भाऊही दहावीतच असल्याने शिक्षकांनी त्याच्याकडे हीना पेपरला का येत नाही अशी विचारणा केली असता त्याने तीच्या पायाला थोडे लागलेय अशी माहिती दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com