सराईत गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे  - समर्थ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने बंडगार्डन, लष्कर, खडकमाळ आणि स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. 

पुणे  - समर्थ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने बंडगार्डन, लष्कर, खडकमाळ आणि स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. 

शंकर भरत देवकुळे (वय 24, रा. बोरावके वस्ती, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. 
वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत केईएम रुग्णालयाच्या परिसरातून काही दुचाकी चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी न्यू नाना पेठेतील संतोष मनोज सकट यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने समर्थ पोलिसांनी नाकाबंदी करून शंकर देवकुळे या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी देवकुळे हा पार्किंगमधील दुचाकी बनावट चावीच्या मदतीने चोरी करीत होता. 

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि लष्कर विभागाचे सहायक आयुक्‍त नीलेश मोरे यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सतीश चव्हाण, उपनिरीक्षक नितीन अतकरे, कर्मचारी दत्तात्रेय येळे, सुशील लोणकर, संतोष काळे, सचिन शेजाळ, नीलेश साबळे, अनिल शिंदे, अजय शितोळे, साहिल शेख, नवनाथ भोसले आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: 11 bike seized