

Major Financial Scam Alandi Patsanstha Duped of ₹11 Crore
आळंदी : येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनावट कर्जदार उभे करून त्यांना सोनेतारण कर्ज देत ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. २३) रात्री गुन्हा दाखल केल आहे. त्यामध्ये पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिव बाळू अर्जुन पवार (रा. पगडे वस्ती- चऱ्होली खुर्द), पतसंस्थेचा ऑडिटर संजय मोहन लांडगे (रा. हडपसर, पुणे) आणि सोनार पूर्णानंद अरविंद खोल्लम (वय ५२, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली), या तिघांचा समावेश आहे.