esakal | बारामती-इंदापूर तालुक्यातील पिकविमा धारकांना 25 टक्के आगाऊ रक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Help

बारामती-इंदापूर तालुक्यातील पिकविमा धारकांना 25 टक्के आगाऊ रक्कम

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत बारामती (Baramti) व इंदापूर (indapur) तालुक्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना 25% आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिका-यांनी नुकतीच जारी केली. बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी या बाबत माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम 2021-22 साठी जाहीर केली आहे. या योजनेमध्ये खरीपाची चौदा पिके समाविष्ट असून, तालुका निहाय व महसूल मंडळनिहाय पिके अधिसूचित केलेली आहेत.

खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कांदा या पिकांचा या योजनेमध्ये समावेश आहे. योजनेत प्रत्येक पिकाचा विमा संरक्षणासाठी जोखीम स्तर 70 टक्के व पीक निहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित केलेली आहे. विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासन भरत असते. शेतकऱ्याचा विमा हिस्सा हा पीकनिहाय 2 ते 5% इतका आहे. उर्वरित 95 ते 98 टक्के रक्कम केंद्र शासन व राज्य शासन भरते.

हेही वाचा: पुणे शहरात डुक्करांचा सुळसुळाट

विमा संरक्षित रकमेची नुकसान भरपाई शासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात येणार्‍या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना दिली जाते. याच बरोबर स्थानिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे उदाहरणार्थ पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे अपेक्षित उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्केच्या मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यात 21 जुलै ते 25 ऑगस्ट या कालावधीत 25 ते 35 दिवसाचा पावसाचा खंड पडलेने जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन, बारामती व इंदापूर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा: Pune:अजितदादांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड

इंदापूर तालुक्यातील तूर व सोयाबीन तसेच बारामती तालुक्यातील तूर, भुईमूग व सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कम मिळणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील सणसर व बारामती तालुक्यातील सुपा, लोणीभापकर ,मोरगाव, करंजेपुल या महसूल मंडळातील बाजरी पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची 25% रक्कम देणेकरीता अधिसूचना जारी केली आहे.

पिकविमा गरजेचाच....

तरी यापुढे शेतकऱ्यांनी रब्बी, उन्हाळी तसेच खरीप हंगामात देखील जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पिकांचा पिकविमा काढावा जेणेकरून नैसर्गिक आपत्ती, स्थानिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसानीची भरपाई मिळेल. तरी सर्व शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पिकाचा विमा नियमितपणे काढावा- वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती.

loading image
go to top