esakal | पुणे शहरात डुक्करांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

 डुक्करांचा सुळसुळाट

पुणे शहरात डुक्करांचा सुळसुळाट

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : महानगरपालिका हद्दीत वराह (डुक्कर) पालन करण्यास बंदी असताना देखील व्यवसायिक वराह पालन केले जाते.शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी तसेच कोथरूड येथील कचरा डेपो या परिसरात वराह पालनाचा व्यवसाय जोरात चालतो.मॉडेल कॉलनी येथे वीर चाफेकर नगर परिसरात वराहांना खाण्यासाठी खाराब अन्न दिले जाते,त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधीला समोरे जावे लागते.

हेही वाचा: इंदापूर : मागील पंधरा दिवसात ८२ हजार कॅरेट डाळिंबाची विक्रमी आवक

घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरण्याची भिती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.या संदर्भात महापालिकेकडे दररोज साधारण वीस ते पंचवीस नागरिक तक्रारी करत असतात, मात्र अपुरी यंत्रणा असल्याने कारवाई कमी पडत आहे.त्याचा परिणाम वराहांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.कारवाई करताना 'भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड' च्या नियमानुसार कारवाई करावी लागते.वराह पकडल्यानंतर कत्तलखान्यात त्यांची कत्तल केली जाते.

हेही वाचा: Pune:अजितदादांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड

मादी वर्षातून दोन वेळा कमीत - कमी बारा ते अठरा पिल्लांना जन्म देते त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. थेरगाव कत्तलखान्यात दररोज फक्त बारा वराहांचीच कत्तल केली जाऊ शकते, तर पुनावळा येथील कत्तलखान्यात दररोज पस्तीस वराहांची कत्तल करता येते.पुणे शहरात वराह पालन व्यवसाय करणारे जवळपास दोनशे कुटुंब आहेत.अशी माहिती महापालिकेच्या माध्यमातून मिळाली.

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

"महापालिकेच्या हद्दीत वराह पालनासाठी परवानगी नाही.नागरिकांच्या तक्रारी नुसार 'भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड' च्या नियमानुसार कारवाई केली जाते.नागरिकांना वराहांचा त्रास होत असेल तर महापालिकेकडे तक्रार करावी".

- डॉ.अशिष भारती आरोग्य प्रमुख पुणे महापालिका

"निलगिरी पाटबंधारे सोसायटी समोर कचरा टाकला जातो,त्यामुळे तिथं वराह पालन केले जात होते.मागील काही दिवसांपूर्वी कारवाई करून वराह घेऊन गेले परंतु कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे.

- नितीन देशपांडे, रहिवासी निलगिरी सोसायटी मॉडेल कॉलनी.

"कोथरूड कचरा डेपो समोर मुख्य रस्ता असल्याने तिथं वराह मोकाट फिरत असतात.तिथं पाऊस पडला की वहनासमोर अचानक आले की अपघात होतात.त्यांच्या अंगावर घाण असते तसेच ते वस्तीमधून फिरतात.यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे"

-रविंद्र चौधरी, रहिवासी कोथरूड.

loading image
go to top