लय भारी, पुण्यातील या 11 शिक्षकांनी मिळवली आयआयटीची पदवी

teacher
teacher

पारगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील 11 गणित शिक्षकांनी आयआयटी पवईची "मास्टर ट्रेनर पदवी" ऑनलाईन पध्दतीने संपादन केली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्रधिकरण) पुणे व आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने क्वालीटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ्स एज्युकेशन प्रकल्पाकरिता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून 323 माध्यमिक गणित शिक्षकांची निवड चाचणीद्वारे निवड करण्यात आली. त्यांना दोन वर्षांमध्ये आयआयटी मुंबई या अग्रगण्य संस्थेच्या गणित विभागामधील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गणित विषय घटक निर्मिती, अध्यापन पद्धती, जिओजेब्राचा वापर, शैक्षणिक ई- साहित्य निर्मिती, व्हिडिओ सादरीकरण इत्यादींचा समावेश होता. 

प्रशिक्षणाच्या शेवटी जुलै 2020 मध्ये सर्व प्रशिक्षणार्थीची (मास्टर ट्रेनर सर्टिफिकेशन) परीक्षा घेउन त्या सर्वांना राज्यस्तर तज्ज्ञ मार्गदर्शक (मास्टर ट्रेनर) ही पदवी देण्यात आली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 11 गणित अध्यापकांचा समावेश आहे. या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आध्यापकांना आय.आय.टी. पवईचे प्रोफेसर इंदर के. राणा यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर या पदवीचा पदवीप्रदान सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला.

पदवी मिळविलेले शिक्षक पुढीलप्रमाणे : संगीता शिवलाल काळे (नू.म.वि. मुलांची शाळा पुणे), डॉ. शाहिद हझरतअली शेख (व्ही. एस. सातव विद्यालय वाघोली, ता. हवेली), विजया संतोष काळे (मुक्तांगण इंग्लिश स्कूल पर्वती, पुणे), सौजन्या शरद बकरे (कांतीलाल शहा विद्यालय तळेगाव दाभाडे, ता. मावळ), जितेंद्र पुरुषोत्तम त्रिवेदी (विद्या विकास विद्यालय अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव), रमेश निवृत्‍ती जाधव, श्री संभाजी राजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, सचिन मधुकर धनवट (आचार्य प्र. के. अत्रे विद्यालय पिंपळे, ता. पुरंदर), संदिप पोपट लोणकर (बी.जे.एस. विद्यालय वाघोली), मनीषा रमणलाल नहार (एच.एच.सी.पी. गर्ल्स हायस्कूल हुजुरपागा, पुणे), ज्ञानेश्वर अण्णासाहेब काकडे (एम. एफ. गायकवाड विद्यालय दावडी, ता. खेड), दीपाली भरतराव थिटे (एस. एम. जोशी विद्यालय हडपसर, पुणे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com