लोहगाव विमानतळावर 11 नवी स्वच्छतागृहे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - लोहगाव विमानतळावर 11 नवी स्वच्छतागृहे प्रशासनाने उपलब्ध केली आहेत. त्यातील पाच पुरुषांसाठी, तर तीन महिलांसाठी असून, तीन दिव्यांगांसाठी आहेत. 

पुणे - लोहगाव विमानतळावर 11 नवी स्वच्छतागृहे प्रशासनाने उपलब्ध केली आहेत. त्यातील पाच पुरुषांसाठी, तर तीन महिलांसाठी असून, तीन दिव्यांगांसाठी आहेत. 

सुरक्षितता तपासणीसाठीच्या विभागात दोन, विमानतळावर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना उर्वरित स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. आठ स्वच्छतागृहांची कामे पूर्ण झाली असून, तीन स्वच्छतागृहांची कामे येत्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी नमूद केले. विमानतळावरील प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू झाले होते. त्यात काही जुन्या स्वच्छतागृहांची पुनर्उभारणी करण्यात आली आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा ऑगस्ट 2016 मध्ये लोहगाव विमानतळावर आले होते. तेव्हा त्यांनी स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची सूचना केली होती. या पार्श्‍वभूमीवर विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिल्यावर स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. 

चेक इन आणि सिक्‍युरिटी एरियामध्ये खाद्यपदार्थांच्या तीन स्टॉलला विमानतळ प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबतची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या 11 एप्रिलपासून हे स्टॉल कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली. 

Web Title: 11 new sanitary latrines in Lohagao airport