11 th Admission : कागदपत्राअभावी अकरावीत प्रवेश नाकारला; महाविद्यालयात उडाला गोंधळ

प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिल्या नियमित फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह प्रवेश निश्चित करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय गुरुवारी गाठले
11 admissions
11 admissionssakal

11 th Admission - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या नियमित फेरीअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश नाकारला जात होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये आणि खुद्द महाविद्यालय प्रशासनामध्येही गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिल्या नियमित फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह प्रवेश निश्चित करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय गुरुवारी गाठले. दरम्यान, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत होते. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी-पालक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. दरम्यान विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली.

11 admissions
Mumbai: खानने ऑफर नाकारली म्हणून ? वांद्र्यात ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर

‘विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रवेशास आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या संघटनांनी लावून धरली. यासंदर्भात पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल तायडे, आरपीआयचे (आठवले) सरचिटणीस महिपाल वाघमारे, दलित पॅंथर ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष प्रकाश सावळे,

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश खुरपे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष अतुल झोडगे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे यांसह विविध संघटनांनी शिक्षण उपसंचालकांना मागणीचे निवेदन दिले.

त्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली आणि त्यासंदर्भात पाठपुरावा करण्यास सुरवात झाली. राज्याच्या शिक्षण विभागाकडे प्रवेशास आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

11 admissions
Mumbai : मनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील ईडी चौकशी थांबवा! म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादरीकरणासाठी तीन महिन्याची मुदतवाढ

‘‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास, संबंधित विद्यार्थ्यांकडून अर्जाची पोहोच पावती आणि हमीपत्र भरून घेऊन त्याला प्रवेश देण्यात यावा.

तसेच विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी,’’ अशी सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com