esakal | माजी आमदाराच्या निवाऱ्यासाठी अजित पवारांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

daunad mla

माजी आमदाराच्या निवाऱ्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दौंड : दौंड (daund) तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक तथा दिवंगत माजी आमदार जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या कुटुंबीयांच्या घराच्या प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी २४ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. 9Ajit Pawar initiative shelter of former MLA daund)

ज. ता. पाटसकर (Former MLA Jagnanath Tatyaba pataskar) हे सन १९६७ ते १९७२ दरम्यान दौंडचे आमदार (daund mla) होते. दौंडचे एसटी स्टॅण्ड आणि उप जिल्हा रूग्णालयाकरिता त्यांनी स्वतःची साडेसात एकर जमीन दिली होती. त्यांना या जमिनीचा मोबदला तब्बल पाच वर्षांच्या विलंबाने मिळाला. दौंड नगरपालिकेने २७ डिसेंबर १९९० रोजी जागेसंबंधी ठराव केला. तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्ते २४ ऑक्टोबर १९९२ रोजी या जागेचे भूमीपूजन केले. परंतु, शासनाने जागेसंबंधी घोळ घालून आजतागायत त्यांच्या कुटुंबीयांना त्या जागेचा ताबा दिलेला नाही.

हेही वाचा: पाणी पुरवठा निविदेतील ‘जादू’ची महापालिका वर्तुळात चर्चा

भाड्याच्या खोलीत राहणारे पाटसकर यांना दौंड नगरपालिकेने शहरात सव्वा गुंठे जागा देण्याचा ठराव केला होता. त्यांच्या हयातीत व त्यानंतरही विविध कारणे देत सदर जागा दिली नाही. याबाबत ‘सकाळ’चे केडगाव येथील बातमीदार रमेश वत्रे यांनी समाज माध्यमाद्वारे वाचा फोडली. त्याची दखल घेत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत जागेसंबंधी प्रलंबित विषयाची माहिती दिली. त्यांनी याबाबत शनिवारी (ता. २४) पुणे येथे बैठक घेण्याचे संबंधितांना निर्देश दिले. त्यानुसार पुण्यातील विधान भवन येथे बैठक आयोजित केली आहे.

हेही वाचा: पुणे : 'पीएमआरडीए’त शिवसेनेचा वरचष्मा

दरम्यान, पाटसकर कुटुंबीयांची होणारी परवड पाहून शासनदरबारी करावयाच्या पाठपुराव्याकरिता रमेश वत्रे यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता. २०) दौंड येथे एक सहविचार बैठक घेण्यात आली. या बैठकीस भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, ज. ता. पाटसकर यांचे चिरंजीव हरिभाऊ, वैशाली नागवडे, अॅड. प्रशांत गिरमकर, विकास खळदकर, जयराम सुपेकर, अनिल सोनवणे, तुषार सोनवणे आदी उपस्थित होते.

loading image