दोन तासांत १११ कोटींची कामे मंजूर

PCMC
PCMC

पिंपरी - विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे १११ कोटी ६२ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. अवघ्या दोन तासांत दोन सभांचे कामकाज उरकण्यात आले. गेल्या आठवड्यातील तहकूब व चालू आठवड्यातील नियमित अशा दोन्ही सभा झाल्या. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

देहू-आळंदी ३० मीटर रुंद डीपी (विकास आराखडा) रस्त्याच्या कामासाठी ४५ लाख; वायसीएम रुग्णालयातील लिफ्ट देखभाल, दुरुस्तीसाठी ३० लाख; बोपखेल येथील बहुद्देशीय इमारतीचा विस्तार करण्यासाठी ७१ लाख; महात्मा फुलेनगरमधील नाला विकसित करण्यासाठी ३७ लाख; इ क्षेत्रीय कार्यालयात फर्निचर खरेदीसाठी ५० लाख; प्रभाग नऊमधील चौक सुशोभीकरणासाठी ५८ लाख; डॉ. हेडगेवार मैदानावर लॉन लावण्यासाठी ३७ लाख; ब प्रभागांतर्गत विविध ठिकाणी ज्येष्ठांसाठी सोयीसुविधा पुरविण्यासाठी ४२ लाख; भुजबळ चौक ते वाकड वस्तीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी तीन कोटी सात लाख; रुपीनगर तळवडेतील नाला बांधण्यासाठी ५३ लाख; प्रभाग १० मधील उद्यानात विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी ५० लाख; पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीच्या कामासाठी ४९ लाख; महापालिका इमारत, अन्य कार्यालये, दवाखाने, शाळा, उद्याने व इतर ठिकाणी पाण्याच्या टाक्‍यांची साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी २५ लाख; चऱ्होलीतील जलवाहिनी स्थलांतरासाठी ५२ लाख; वाकड, ताथवडे व पुनावळेत विविध सेवावाहिन्यांसाठी खोदलेले चर दुरुस्तीसाठी ६३ लाख; प्रेमलोक पार्क, वीर सावरकर उद्यानातील कामांसाठी ८८ लाख आणि प्रभाग १६ मधील नाल्याच्या बांधण्यासाठी एक कोटी चार लाख रुपयांचा निधी स्थायी समितीने मंजूर केलेला आहे. 

लाइट हाउस प्रकल्प
बेरोजगार युवक-युवतींना आवडीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा, असा ‘लाइट हाउस’ प्रकल्प महापालिका राबविणार आहे. त्याला स्थायी समितीने बुधवारी (ता. ८) मंजुरी दिली. 

महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि पुणे सिटी कनेक्‍ट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यातर्फे पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कक्षेत जागांच्या उपलब्धतेनुसार हा रोजगार निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात महापालिका क्षेत्रातील १८ ते ३० वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतील, त्यामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्‍न सुटेल, असे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले. 

महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ‘ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल’ व्यावसायिक प्रशिक्षणाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक टुल्स किट, इक्विपमेंट व मशिनरी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ६० टक्के भागात समन्याय पाणी वितरण यंत्रणा राबविण्यासाठी नवीन जलवाहिन्या व नळजोड देणे, अनधिकृत नळजोड अधिकृत करणे, नवीन जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व दफनभूमीत काळजीवाहक पुरविणे, मयत पास घेणे व संबंधित कार्यालयात जमा करणे, या कामासाठी वर्षाकरिता कर्मचारी नियुक्तीसाठीच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

विद्युत कामांसाठी निधी
चोविसावाडी ते चऱ्होलीपर्यंत डीपी रस्ता : एक कोटी ३७ लाख; मोशी-आळंदी रस्ता ते डुडुळगाव गावठाण डीपी रस्ता : एक कोटी ६९ लाख; चऱ्होली मुख्य रस्ता (आझादनगर) ते काळेवाडीपर्यंतचा डीपी रस्ता : एक कोटी; मोशी-आळंदी रस्ता- गायरान- कुदळे वस्ती- आळंदी रस्ता : एक कोटी ९८ लाख; पिंपळे गुरव व नवी सांगवी : दोन कोटी; दिघी : ६५ लाख.

डांबरीकरणासाठी 
ताथवडे : ४३ लाख; वाकड दत्त मंदिर रस्ता : ३६ लाख; चिखली धर्मराजनगर, बगवस्ती : ५० लाख; चिखली साने चौक ते शिवरकर चौक रस्ता : ९६ लाख; त्रिवेणीनगर ते कुदळवाडी चौक स्पाइन रस्ता : एक कोटी; निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील रस्ते : २८ लाख.  रहाटणी व पिंपळे सौदागर : ४२ लाख; काळेवाडी : ४१ लाख; चिखली शिवशंकरनगर : ४१ लाख; मोरेवस्ती - म्हेत्रेवस्ती : ९३ लाख; सोनवणेवस्ती रामदासनगर : ५१ लाख; प्रभाग २५ साठी : ८३ लाख; प्रभाग २८ मध्ये : ४३ लाख; पिंपळे गुरव : ३८ लाख; रहाटणी व पिंपळे सौदागर : ९३ लाख.

काँक्रिटीकरणासाठी
प्रभाग २३ मधील पाण्याची टाकी ते बीआरटी रस्ता : तीन कोटी ४६ लाख; विशालनगर वाघजाई हॉटेलपासून कस्पटे चौक : एक कोटी ४९ लाख; प्रभाग २९ मधील रस्ते : दोन कोटी सात लाख

रस्ते सुधारणा, सुशोभीकरण
गवळीनगर व सॅंडविक कॉलनी : ४३ लाख; प्रभाग नऊमधील रस्ते : ७४ लाख; चक्रपाणी वसाहत, महादेवनगर : ४० लाख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com