
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या फेरीअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एकूण ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय देण्यात आले आहे. या फेरीत मंगळवारी एकूण १८ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे.