अकरावी प्रवेशाच्या आठ टक्के जागा वाढवणार : शिक्षणमंत्री

1mission_admission_0.jpg
1mission_admission_0.jpg

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियतेतील अंतर्गत गुणांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द करायचे नाहीत आणि अकरावी प्रवेशाच्या आठ टक्के जागा वाढवायच्या, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ग्राह्य धरायचे नाहीत, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यावरून गेली आठवडाभर हा वाद धुमसत होता. त्यामुळे आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देवून या प्रकरणाचा पाठपुरवा केला होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com