पुण्यातील लसीकरण खोळंबलं; कोविन ॲपमुळे अडचणी, नागरिक वैतागले

यामुळे पुण्यातील लसीकरण काही वेळासाठी खोळंबले आहे.
vaccination
vaccinationesakal

कोरोना प्रतिबंध लसीकरण यादीत १२ ते १४ या वयोगटाचा समावेश करण्यात आला असून आजपासून लसीकरण सुरु झाले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्याच्या केंद्रांवर लसीकरण सुरु झाले आहे. दरम्यान, ६० वर्षांवरील नागरिकांनाही बुधवारपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणाच्या (Covid -19) पहिल्याच दिवशी आज पुण्यात (Pune) लसीकरणादरम्यान एक वेगळीच समस्या समोर आली आहे. परिणामी यामुळे पुण्यातील लसीकरण काही वेळासाठी खोळंबले आहे.

vaccination
'कोण हे कपिल सिबल? त्यांचं काय कर्तृत्व?' जी-२३ नेत्यांवर भडकले काँग्रेस नेते

१२ ते १४ या वयोगटासाठी लसीकरण करणे गरजेचे असल्याने नागरिकांनी ऑनलाईन बुकींग (Online Booking) करावे असा आदेश शासनाकडून आला होता. मात्र पुण्यात लसीकरणासाठी असलेले कोविन ॲप (CoWin App) चालत नसल्यानं अनेक मुलांची नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अजुनही सुरू झालेले नाही. दरम्यान, पुण्यात कुठल्याच लसीकेंद्रावर लसीकरण सुरू झालेला नाही त्यामुळे त्यांना पालकांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण विविध कारणांनी रखडले होते. त्याला आरोग्य विभागाने आता मंजुरी दिली आहे. मुले सुरक्षित तर देशाचे उद्याचे युवा सुरक्षित, असे नमूद करत आरोग्य विभागाने लसीकरणाला चालना देण्याचे ठरवले आहे. लसीकरण यादीत १२ ते १३ आणि १३ ते १४ अशा दोन गटात वर्गीकरण केले आहे. शालेय पातळीवर वार्षिक परीक्षा सुरु होणार असून त्यानंतर मुले उन्हाळी सुटीला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

vaccination
दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com