esakal | अवैधरित्या वृक्षतोड करुन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 12 टन लाकूड जप्त

बोलून बातमी शोधा

12 tonnes of timber seized and action taken against illegal transport and Tree Cutting}

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार जांबूत (ता. शिरूर) येथून अवैधरित्या वृक्षतोड करून दोन चारचाकी वाहन वाहतूक करत असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांना दिसले. या बाबतची माहिती त्यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. मंचर परीसरात ही अवैधरित्या वृक्षतोड झाली आहे.

अवैधरित्या वृक्षतोड करुन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 12 टन लाकूड जप्त
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी(पुणे)  : अवैधरित्या वृक्षतोड करुन जांबूत (ता. शिरूर) येथून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये दोन चारचाकी वाहन व 12 टन लाकूड जप्त केल्याचे शिरूरचे परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार जांबूत (ता. शिरूर) येथून अवैधरित्या वृक्षतोड करून दोन चारचाकी वाहन वाहतूक करत असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांना दिसले. या बाबतची माहिती त्यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. मंचर परीसरात ही अवैधरित्या वृक्षतोड झाली आहे.

हवाई युद्धात भारताचं पारडं झालं भारी; जाणून घ्या Warrior Drone ची वैशिष्ट्ये​

हरेश कचरू सर्यवंशी व मयुर धोडिंबा नगरे हे दोघेही हंगे ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथील या गाडीचे चालक आहेत. या बाबत वनरक्षक सविता चव्हाण व वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ यांनी दिलेल्या माहिती नुसार निम, वावळा, सुबाभूळ या झाडांची तोड करण्यात आली आहे. दोन वाहन व अंदाजे 12 टन लाकूड असून या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास वनविभाग करत आहे. 

पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात