पुणे जिल्ह्यात १२४५ बालके कुपोषित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून ग्रामीण बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २३ लाख ८७ हजार रुपयांचे अनुदान अंगणवाडी स्तरावर देण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये एक हजार १३७ बालकांना दाखल करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

पुणे - अंगणवाड्यांमधील बालकांच्या पोषण आहारावर लाखो रुपये खर्च करूनही जिल्ह्यात पाच वर्षे वयापर्यंतची ११ हजारांहून अधिक बालके मध्यम कमी वजनाची आढळली आहेत, तर १२४५ बालके कुपोषित असून, त्यात १०८ बालके तीव्र कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे.

एकात्मिक बाल विकास (आयसीडीएस) योजनेतून जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात अशा अंगणवाड्यांची संख्या चार हजार ६१६ इतकी आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दहा टक्‍के निधीतून ग्रामीण बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी) सुरू करण्यात आली आहेत. गतवर्षी या केंद्रांमध्ये दोन हजारांहून अधिक बालकांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ४४ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली. परंतु एक हजार १३ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झालेली नाही. जुलै २०१८ मध्ये ६११ तीव्र कुपोषित बालके होती. ही संख्या सध्या १०८ इतकी आहे.

अंगणवाडी स्वतंत्र इमारतींची संख्या 
वर्ष २०१४ - २०१५

२३३४
वर्ष २०१४ - २०१५
३११६

पुणे जिल्हा सद्य:स्थिती
२,४३,६११ पाच वर्षे वयोगटापर्यंत बालके  
२,३०, ८७९  (९४.७० टक्‍के) सर्वसाधारण बालके
१०, ४५९ (४.३२ टक्‍के) मध्यम कमी वजनाची बालके
१०२८ (०.४२ टक्‍का) तीव्र कमी वजनाची बालके
११३७ (०.४६ टक्‍का) मध्यम बालके
१०८ (०.०४ टक्‍का) तीव्र कुपोषित बालके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1245 Malnourished Child in Pune District Healthcare